नांदेड:(दि. १४ जानेवारी २०२५)
यशवंत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विशेष वार्षिक शिबिराचा समारोप समारंभ मौजे मरळक येथे माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार उत्साहात पार पडला.
समारंभाचे अध्यक्ष श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष ॲड. उदयराव निंबाळकर होते तर विशेष अतिथी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी होते तसेच प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.कबीर रबडे, प्रा.कैलास दाड, जिल्हा समन्वयक डॉ.अमोल कोल्हे आणि प्रा. भारती सुवर्णकार यांची होती.
प्रमुख अतिथी डॉ.मलिकार्जुन करजगी यांनी मार्गदर्शनामध्ये, राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व सांगितले. राष्ट्रीय सेवा योजना ही राष्ट्रहितासाठी किती महत्त्वाचे आहे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना समाजाचे बळ बनविण्याचे व्यासपीठ आहे, असे मत व्यक्त केले.
प्रा. कैलाश दाड यांनी, राष्ट्रीय सेवेतून विद्यार्थी हा घडत असतो आणि विद्यार्थी हेच माझे दैवत आहे, हे स्पष्ट केले.
अध्यक्षीय समारोपात, ॲड.उदयराव निंबाळकर यांनी, विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये राष्ट्रीय सेवा योजना निश्चितच मोलाचा वाटा उचलेल, असे मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन गणेश विनकरे याने केले. प्रास्ताविक डॉ. कैलाश इंगोले यांनी तर आभार डॉ.राजरत्न सोनटक्के यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी डॉ.कैलास इंगोले, डॉ. राजरत्न सोनटक्के, प्रा.राजश्री भोपाळे, प्रा. अभिनंदन इंगोले, प्रा. श्रीराम हुलसुरे, शिबिरार्थी स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले तसेच उपप्राचार्य डॉ.हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, नाना शिंदे, डॉ.अजय गव्हाणे आदींनी सहकार्य केले.

addComments
टिप्पणी पोस्ट करा