मुंबई - सीताराम प्रकाश हायस्कूल, वडाळा येथे ७ जानेवारी २०२५ रोजी तालुकास्तरीय नवभारत साक्षरता अभियान उल्हास मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिरताजी देवी, सारिका करडे, शहनाज, तुकाराम पाटील ह्या नवसाक्षरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर माधुरी मुरकर मॅडम यांनी नवभारत साक्षरता अभियान कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन केले. पीपल्स वेल्फेअर सोसायटी हायस्कूल, सायन शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व साक्षरता गीताचे सादरीकरण केले. एम.पी. भूत्ता हायस्कूल, सायन येथील शाळेने पथनाट्य सादर केले. साधना विद्यालय, सायन शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘साक्षरतेकडून समृद्धीकडे’ या विषयावर आधारित पथनाट्य सादर केले. त्यानंतर अभ्युदय हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पपेट शोच्या माध्यमातून संवादाची माध्यमे हा विषय सादर केला. पूनम पागधरे मॅडम यांनी नवभारत साक्षरता अभियानाचा आढावा सादर करणारे अहवाल वाचन केले. डॉ. वैशाली वीर मॅडम, योजना कार्यालय, मुंबई विभाग या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्यासोबत व्यासपीठावर स्थानापन्न होण्याचा बहुमान नवसाक्षरांना मिळाला. डॉ. वैशाली वीर मॅडम यांनी आपले अमूल्य मार्गदर्शन केले. तसेच नवसाक्षरांनी स्वतःचे मनोगत मांडले व स्वतःचे अनुभव सांगितले. डॉ. वैशाली वीर मॅडमच्या हस्ते नवसाक्षरांचा सत्कार करण्यात आला. तसेच ज्या-ज्या शाळांनी शैक्षणिक साहित्य निर्मिती केली, तसेच पथनाट्य सादर केले; त्या शाळांच्या विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा वीर मॅडमच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. आभार प्रदर्शन व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
"तालुकास्तरीय नवभारत साक्षरता अभियान उल्हास मेळाव्याचे आयोजन"
• Global Marathwada


addComments
टिप्पणी पोस्ट करा