मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी असलेली संघटना म्युनिसिपल मजदूर युनियन मुंबईच्या नेतृत्वाखाली १७ जानेवारी २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो कामगार आणि कर्मचाऱ्यांचे लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्क नोकरी अबाधित ठेवली. त्यासाठी सुमारे दीड दोन वर्षे अविरत लढणारे महाराष्ट्र राज्य महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद कामगार कर्मचारी फेडरेशनचे कामगार नेते व मा. उच्च न्यायालयात औरंगाबाद खंडपीठ समोर प्रभावी व अभ्यासपूर्ण बाजू मांडणारे ज्येष्ठ विधितज्ञ वकील यांचा गौरव व भव्य विजयी मेळावा संपन्न झाला. राष्ट्रीय मिल मजदूर संघ, भोईवाडा, परळ मुंबईच्या सभागृहात या विशाल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, अध्यक्षस्थानी फेडरेशनचे अशोक जाधव, स्वागताध्यक्ष वामन कविस्कर, प्रस्तावना यशवंतराव देसाई यांनी केली. विशेष अतिथी वरिष्ठ विधीतज्ञ ॲड. हरीश बळी आणि ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲड. बळीराम बी. शिंदे, प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद कामगार व कर्मचारी फेडरेशनचे प्रमुख सरचिटणीस गौतम खरात, सुरेश ठाकूर, अनिल जाधव, संतोष पवार आणि महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे सरचिटणीस संजय वढावकर, श्रीमती मनिषा काकड व राज्यातील प्रमुख कामगार नेते तसेच म्युनिसिपल मजदूर युनियन मुंबईचे कार्याध्यक्ष यशवंतराव देसाई, इंजि. रमेश भुतेकर-देशमुख उपस्थित होते. या भव्य विजयी मेळाव्यास उपाध्यक्ष, संघटक, कार्यकारिणी सदस्य, कामगार, कर्मचारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून मेळावा यशस्वी केला. अतिथीचे स्वागत म्युनिसिपल मजदूर यूनियन मुंबईचे अध्यक्ष अशोक जाधव, सरचिटणीस वामन कविस्कर, कार्याध्यक्ष यशवंतराव देसाई, कोषाध्यक्ष शरद राघव, माझी कामगार अधिकारी सहदेव मोहिते, सर्व उपाध्यक्ष, संघटक, पूर्णवेळ पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्य यांनी केले.
आपला
मारुती विश्वासराव

addComments
टिप्पणी पोस्ट करा