नांदेड - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि.26 जानेवारी 2025 रविवार रोजी सकाळी ठिक 8.00 वाजता भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 76 वा वर्धापन दिन मोठ्या हर्षोउल्हासात साजरा करण्यात आला.
सर्व प्रथम आगार व्यवस्थापक अनिकेत बल्लाळ यांच्या हस्ते ध्वजारोहन करून मानवंदना देण्यात आली. तद्नंतर भारतीय संविधानाच्या उद्दिशिकेचे (सरनामा) चे वाचन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच.मिसलवाड यांनी करून सर्व कामगार कर्मचाऱ्यांना सामुहिकरित्या शपथ दिली. यावेळी प्रजासत्ताक दिन व चालक दिनाचे औचित्य साधून रा.प.म.आगारातील कामगार कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ठ कामगिरी बजावून प्रवासी सेवा दिल्याबद्दल आगारातील चालक, वाहक, यांत्रिक कामगार कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देवून आगार व्यवस्थापक अनिकेत बल्लाळ व बसस्थानक प्रमुख यासीन हमीद खान यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी विशेष सन्मान म्हणून बसस्थानकात प्रवाशांची नऊ तोळ्यांची सोने असलेली बॅग, चोरट्यांनी पळवित असतांना पाठलाग करून कर्तव्यावर असलेले आगाराचे सुरक्षा जवान पवन बाबुराव पाटोळे यांनी महिला प्रवाशांना परत मिळवून देवून चोख कामगिरी बजावल्याबद्दल आगार व्यवस्थापक अनिकेत बल्लाळ व बसस्थानक प्रमुख यासीन हमीद खान यांच्या हस्ते त्यांचा पुष्पहाराने ह्दय सत्कार करून सन्मान करण्यात आला.
शेवटी यावेळी आगार व्यवस्थापक अनिकेत बल्लाळ यांनी कामगार कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून आगार व्यवस्थापक अनिकेत बल्लाळ, बसस्थानक प्रमुख यासीन हमीद खान, सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक विष्णू हारकळ, श्रीनिवास रेणके, आगार लेखाकार सतिश गुंजकर, चार्जमन संदीप बोधनकर, वाहतुक निरीक्षक सुधाकर घुमे, आकाश भीसे, शेख मोबीन, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच.मिसलवाड, वाहतुक नियंत्रक बालाजी शिंदे, प्रविण दामेरा, सुनिल मोरे, राजेंदरसिंघ चावला, निर्दोष पवार, वरिष्ठ लिपीक संतोष ढोले, माधव तोडे, गुलाम रब्बानी, सौ.श्वेता तेलेवार, सुनिता हुबे, लक्ष्मी पाटोदेकर, मनिषा कदम, सुरक्षा रक्षक पांडुरंग बुरकुले, आनंद राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष ढोले यांनी केले तर सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन गुणवंत एच.मिसलवाड यांनी केले. याप्रसंगी रा.प.म. आगारातील कामगार-कर्मचारी बंधू-भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

addComments
टिप्पणी पोस्ट करा