नांदेड:( दि.३० जानेवारी २०२५)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला 'वायएमआयटी फेस्ट:२०२५' उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी प्र -कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विदयापीठातील संगणकशास्त्र संकुलातील डॉ.एच.एस. फडेवार होते. याप्रसंगी विचारमंचावर विभागप्रमुख डॉ. श्रीकांत जाधव, समन्वयक प्रा.डॉ.प्रवीण तामसेकर,प्रा. गुरुप्रसाद चौसटे यांची उपस्थिती होती.
प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे यांनी, या उपक्रमाची स्तुती केली तसेच आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात अनेक विषयाना स्पर्धेतुन सामोरे जावे लागते; त्यामुळे असे कार्यक्रम अतिशय गरजचे आहे, असे मत व्यक्त करून विद्यापीठाच्या परीक्षेतुन विविध महाविद्यालयातून स्पर्धेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले आणि भित्तीपत्रकाचे प्रकाशन केले.
या तांत्रिक कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्याना विज्ञान व तंत्रज्ञानातील नवनवीन विषयांची माहिती होण्याकरिता पोस्टर प्रेझेंटेशन व विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य विकसित व्हावी म्हणून एक्स्टेंमपर म्हणजेच सेमिनार प्रेझेंटेशन या दोन स्पर्धांचे विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ऍक्टिव्ह फोरम व डेनिस रीची क्लबमधील विद्यार्थ्यांनी आयोजन केले होते.
विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून तयार केलेल्या या महोत्सवाला लातूर, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातून २०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभला.
परीक्षकांची भूमिका डॉ.एन.ए. पांडे, डॉ.एम.एम.व्ही. बेग व डॉ. अनुराधा जोशी यांनी पार पाडली.
समारोप सोहळ्यात उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे व डॉ.एच.एस पतंगे, प्रमुख अतिथी आय.टी.एम. महाविद्यालयाचे विभागप्रमुख डॉ.माधव बोकारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी विजयी स्पर्धकांना रोख रक्कम व प्रमाणपत्राद्वारे गौरविण्यात आले.
'वायएमआयटी फेस्ट:२०२५' महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे, विद्यार्थ्यांनी संपुर्ण कार्यक्रमाची तयारी परिपूर्णपणे केली होती. कार्यक्रमाचे नियोजन, सूत्रसंचालन, स्पर्धकांना प्रमाणपत्र, कार्यक्रमाचे व्यासपीठ व तांत्रिक बाबी,बैठक व्यवस्था यशस्वीपणे पार पाडल्या.
महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी आयोजक सचिव डॉ.श्रीकांत जाधव, समन्वयक डॉ.प्रवीण तामसेकर व प्रा.गुरुप्रसाद बी.चौसटे तसेच संयोजन समिती सदस्य डॉ.पी. बी. पाठक, प्रा.एन. ए. नाईक, प्रा.सौ शिंदे एस. एम., प्रा. अमरीन खान, प्रा.नीलम अग्रवाल, प्रा. सचिन वडजे, प्रा. चैतन्य देशमुख, प्रा.अफरोज आलम सिद्दिकी आदींनी परिश्रम घेतले तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयीका डॉ.एल.व्ही. पदमारानी राव, प्रबंधक संदीप पाटील अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, विठ्ठल सुरणार, माणिक कल्याणकर, अनुराधा मती, डॉ. अजय गव्हाणे यांनी सहकार्य केले.

addComments
टिप्पणी पोस्ट करा