*'यशवंत ' मध्ये राष्ट्रमाता जिजाऊ जयंती उत्साहात संपन्न*

नांदेड:(दि.१६ जानेवारी २०२५)


          श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या वतीने राजमाता राष्ट्रमाता मां जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

          कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी प्र- कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी भूषविले तर प्रमुख व्याख्यात्या खतगाव येथील मंजुळाबाई प्राथमिक विद्यालयातील सहशिक्षिका सौ. अरुणा शिंदे (जाधव) होत्या. 

           सौ. अरुणा शिंदे यांनी विचार व्यक्त करताना, जिजाऊंचे विचार व संस्कार आजच्या पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे मत व्यक्त केले. स्त्रियांच्या बाबतीत जे संस्कार शिवाजी राजांना मा जिजाऊ यांनी दिले; ते संस्कार आजच्या पिढीला असणे फार गरजेचे आहे; म्हणून जिजाऊ जीवन आणि कर्तृत्व वाचणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले.

           याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे आणि ग्रंथपाल डॉ.कैलास वडजे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राजश्री भोपाळे यांनी केले. वक्त्यांचा परिचय प्रा. प्रियंका सिसोदिया यांनी करून दिला तर आभार प्रा.भारती सुवर्णकार यांनी मानले.

            याप्रसंगी डॉ.शिवराज बोकडे, डॉ.मीरा फड, डॉ.साईनाथ शाहू आदींची आणि विद्यार्थ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.

           कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. कैलास इंगोले, डॉ. राजरत्न सोनटक्के, प्रा.अभिनंदन इंगोले, प्रा.श्रीराम हुलसुरे, डॉ. कांचन गायकवाड, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, डॉ.अजय गव्हाणे तसेच रासेयो स्वयंसेवकांनी प्रयत्न केले.

टिप्पण्या