*ग्राहक पंचायत तर्फे महापुरुषांना अभिवादन*


 *गंगाखेड (प्रतिनिधी).*        दिनांक 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने व राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब तथा स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. शहरातील डॉ. लाईन परिसरातील माऊली जेनेरिक मेडिकल या ठिकाणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा गंगाखेड चे तालुका अध्यक्ष गोपाळ मंत्री, जिल्हा उपाध्यक्ष सोपानराव टोले, जिल्हा महिला सदस्य प्रतिमा वाघमारे, शहराध्यक्ष सुधाकर चव्हाण, तालुका सचिव सय्यद ताजुद्दीन, ग्राहक पंचायत चे सदस्य अनंत काळे, परमेश्वर कातकडे, बालासाहेब सातपुते, अतुल तुपकर, ऍड. उत्तम काळे, संपादक संतोष कलिंदर, कोषाध्यक्ष मेहमूद शेख,  सामाजिक कार्यकर्त्या सूर्यमाला मोतीपवळे, प्रा. चंद्रकला हनुमंते आदींची उपस्थिती होती.

टिप्पण्या