नांदेड (विठ्ठल कल्याणपाड)
नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे दि.२६ रोजी मकर संक्रांत निमित्त देगलूर तालुका महिला समितीच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी देगलूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्षा सौ. रोयलावार कल्पना ताई व कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. तानाजी चव्हाण साहेब यांच्या सुविद्य पत्नी सौ.चव्हाण ताई याच्या उपस्थित प्रथम विठ्ठल रुक्मिणीचे पूजन व आरती करून दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले..
प्रथम उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले नूतन देगलूर तालुका महिला अध्यक्ष सौ. शेशिकला बेतीवार याच्या शुभ हस्ते कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ. रोयलावार कल्पना ताई यांचे स्वागत करण्यात आले.
तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन सौ.चव्हाण ताई यांचे स्वागत तालुका उपाध्यक्ष सौ. सपना मारावार ताई यांच्या हस्ते करण्यात आला.
या नंतर हळदी कुंकवाचा कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले. या कार्यक्रमाला देगलूर शहरातील सर्व पद्मशाली माता - भगिनीनी बहू संख्येने उपस्थित राहून सहभाग घेतला.
हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देगलूर तालुका कार्यकारणी मधील पदाधिकारी व सदस्यांनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले यामध्ये .
अध्यक्षा शेशिकला बेतीवार, उपाध्यक्ष - सपना ताई मारावार, कार्याध्यक्ष मा.नगरसेविका राधिका अडिशेरलावार, सचिव - कविता अन्नमवार, इंदिरा संदूपटलावार, पुष्पाताई सुरकुटलावार, उषाताई शेट्टी,विजयालक्ष्मी दासरवार, लताबाई चौटीवार, जानवी शेट्टी, श्रद्धा दासरवार, राजश्री पुलगमवार, सुनिता आनल दास, भारती उपलंचवार, सुनंदा सुरकुटलावार, सुनंदा आंबटवार, सविताताई गुरुपवार, ज्योती ताई अमृतवार , महादेवी म्यानावार, बेतीवार गोदावरी ताई, पारसेवार ताई, आडेपवार सूनिताताई, अमृतवार सवित्रा, नामावार भारतीबाई, अमृतवार विनया,अमृतवार विजयालक्ष्मी, नामावार लक्ष्मीबाई,गुंडावार मेगाताई, अमृतवार सुचिता , आडेपवार विजयमाला आदि महिला भगिनींनी सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

addComments
टिप्पणी पोस्ट करा