*उत्तरप्रदेश येथील राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघास दोन सुवर्ण, रौप्य, कांस्यपदक*




सेलू(.      ) भारतीय टेनिस व्हॉलीबॉल महासंघाच्या वतीने गाझीपूर उत्तरप्रदेश येथे ३१ डिसें २०२४ ते २ जाने २०२५ दरम्यान संपन्न झाल्या. 

महाराष्ट्र संघांची सुवर्ण कामगिरी केली. 

यात सबज्युनियर मुली व मिश्र दुहेरी गटात सुवर्णपदक तर ज्युनिअर मिश्र दुहेरीत रौप्यपदक , तर ज्युनिअर मुली गटात कांस्यपदक पटकावले. 

•सब- ज्युनिअर मिश्र दुहेरी सुवर्णपदक 🥇  महाराष्ट्र वि. उत्तरप्रदेश दरम्यान महाराष्ट्र संघाने 2-0 सेटमध्ये महाराष्ट्र संघाने सुवर्णपदक पटकावले. रणवीर  भोसले (पुणे),  सोनाक्षी कदम (पुणे) प्रशिक्षक:- निनाद रहाटे(सबब मुंबई)

•सब - ज्युनिअर मुली सुवर्णपदक 🥇 अंतिम सामना महाराष्ट्र वि. झारखंड दरम्यान महाराष्ट्र संघाने 2-0 सेट मध्ये उत्तरप्रदेश चा पराभव करत महाराष्ट्र संघाने सुवर्णपदक पटकावले.यात 

तनुजा  रांजणे(पुणे) सृष्टी शिंदे

वैष्णवी  माने (सांगली)अवनी कांबळे, (नाशिक) प्रांजल  सूर्यवंशी, चैताली चौधरी (जळगाव),प्रशिक्षक:-  मिलिंद कुलकर्णी

•ज्युनिअर मुली  : कांस्यपदक~ 🥉 महाराष्ट्र वि. दिल्ली दरम्यान अतितटी च्या सामन्यात 2-1 सेट मध्ये महाराष्ट्र संघाने कांस्यपदक पदक पटकावले. यात मधुरा  हवलदार,किर्ती  सोळांकुरकर (सांगली)सुलशा  कपासी, श्रावणी वळंजू (सबब मुंबई) नीतूकांवर  चौहान,(छ.संभाजीनगर) , गायत्री  गायके(परभणी)

प्रशिक्षक:- मिलिंद कुलकर्णी (सांगली)

•मिश्र दुहेरी ज्युनिअर: रौप्यपदक , अंतिम सामना हिमाचल प्रदेश वि. महाराष्ट्र दरम्यान हिमाचल प्रदेश संघाने महाराष्ट्र संघाचा 2-0, हिमाचल प्रदेश सुवर्णपदक तर महाराष्ट्र संघास रौप्यपदक पटकावले. यात  सार्थक  माळकर(परभणी), 

तपस्वी पगारे(नाशिक)

प्रशिक्षक:- निनाद  रहाटे

 मॅनेजर :- अंकिता पाटील (जळगाव),अंबादास उंदरे, व्यंकटेश महाले (छ.सभाजीनगर)

•ज्युनिअर मुले चौथा क्रमांक पटकावला यात

नील मयेकर (सबब मुंबई) मयूर बोरसे, प्रतीक बच्छाव (नाशिक), प्रसाद  महाले (परभणी) रोशन चव्हाण (जळगाव)पवन खांडगे (छ.संभाजीनगर)

•सब- ज्युनिअर मुले: चौथा क्रमांक:विवेक  सिंह,करण जाधव (ठाणे)आर्यन गायके (परभणी),गौरव चौधरी(मुंबई शहर) दत्तात्रय  कळसकर , राज आळंजकर (छ.संभाजीनगर)

 यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन 

टेनिस व्हॉलीबॉल चे जनक डॉ व्यंकटेश वांगवाड, राज्य. अध्यक्ष सुरेश रेड्डी क्यातमवार, राज्य सचिव गणेश माळवे, राज्य कार्याध्यक्ष डॉ आबासाहेब सिरसाठ , उपाध्यक्ष  आनंद खरे, रामेश्वर कोरडे, किशोर चौधरी, राज्य कोषाध्यक्ष डॉ.दिनेश शिगारम, जिल्हा सचिव सतीश नावाडे, प्रा.नागेश कान्हेकर, विभागीय सचिव प्रमोद महाजन,  आदींनी शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या