*नवीन पनवेलमध्ये वेळेवर बस सोडण्यासाठी प्रवाशांचे आंदोलन*


नवीन पनवेल येथील एन. एम. एम.टी.ची बस नेहमी अनियमित व नादुरुस्त स्थितीत चालवली जाते. फक्त दोन बसेस येथे चालविल्या जातात. त्यातही सकाळी डेपोतून आलेली बस काही वेळातच बंद पडते. 

     याबाबत अनेक तक्रारी करूनही यावर काहीही उपाय योजना केली जात नाही. याचे एकमेव कारण म्हणजे रिक्षा चालकांची दादागिरी आहे. 

      २ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ८:३० वाजता बस न आल्याने, दोन बसची रांग लागली. बस न सोडण्याचे कारण नेहमीप्रमाणे बस बंद पडली आहे, असे देण्यात आले. प्रवासी संतापून  त्यांनी ५९ नंबरची बस दर पांच मिनीटांनी सोडली जाते. ती बस ४० मिनिटे रोखून धरली. पोलीस आले. प्रवाशांनी सांगितले  बस नं. ५९ ऐवजी ७७ सोडा.  पोलीस प्रवाशांना दम देत होते. कंट्रोलर व अधिकारी याकडे दुर्लक्ष करत होते. शेवटी डेपोतून बस पाठवली, मात्र प्रवाशांना एक तास थांबावे लागले. प्रवाशांची मागणी अशी आहे की, ही बस सकाळी ५ ते रात्री १२:३० पर्यंत चालू ठेवावी. तसेच दोन ऐवजी चार बस चालू कराव्यात. 

    प्रवाशांना असाच त्रास होत राहिला तर, यापुढेही असेच आंदोलन होत राहील व त्यास गंभीर स्वरूप येईपर्यंत प्रशासनाने वाट पाहू नये, बस संघटनेच्या सभासद या आंदोलनात सहभागी झाले होते. असे बंधुत्व फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष समीर राणे यांनी कळविले आहे. 

आपला 

 मारुती विश्वासराव

टिप्पण्या