परभणी (. ) परभणी जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन ची खेळाडू आद्या महेश बाहेती हिची महाराष्ट्र संघात 86 वी कॅडेट सब जुनिअर राष्ट्रीय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या स्पर्धा दिनांक 30 जानेवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान अभय प्रशाल इनडोअर स्टेडियम इंदौर (मध्य प्रदेश) येथे होणार आहे या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा वीस जणांचा संघ जाहीर झाला असून यामध्ये अकरा वर्षे मुलींच्या गटात परभणीच्या आद्या पूजा महेश बाहेती हिची निवड झालेली आहे आद्या सलग तीसऱ्या वर्षी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करणार आहे.
यापुर्वी चार वेळेस राज्य अजिंक्यपद पटकावले आहे.
आद्या ला टेबल टेनिस क्रीडा मार्गदर्शक चेतन मुक्तावार यांचे मार्गदर्शन लाभले.
या निवडीबद्दल भारतीय टेबल टेनिस महासंघाचे सरचिटणीस कमलेश मेहता,महाराष्ट्र राज्य टे.टे संघटना अध्यक्ष प्रवीण लुंकड, राज्य सरचिटणीस यतिन टिपणीस, संजय कडू, ॲड अशीतोष पोतनीस, सर्व पदाधिकारी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, कल्याण पोले, क्रीडा अधिकारी ननक्सिंह बस्सी, सुयश नटकर, रोहन औद्येकर परभणी जिल्हा अध्यक्ष समशेर वरपुडकर , सचिव गणेश माळवे, डॉ.माधव शेजुळ परभणी क्लबचे सचिव डॉ.विवेक नावंदर,यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

addComments
टिप्पणी पोस्ट करा