*यशवंत महाविद्यालयात 'हँड्स ऑन ट्रेनिंग इन अनालिटिकल इन्स्ट्रुमेंटेशन' या विषयावर कार्यशाळा संपन्न*



नांदेड:(दि. २९जानेवारी २०२५):

                यशवंत महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग व सीआयसी यांच्या वतीने पीएम:उषा योजनेअंतर्गत आयोजित दोन दिवसीय "विश्लेषणात्मक उपकरणांच्या प्रत्यक्ष प्रशिक्षण कार्यशाळा"या विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. 

                 याप्रसंगी प्रमुख अतिथी रसायनशास्त्र माजी विभागप्रमुख डॉ.एस.व्ही. कुबेरकर होते तर तज्ञ मार्गदर्शक वाशीकर फार्मा कंपनी,ठाणे येथील संचालक तथा यशवंत महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. सुधीर कुंभार होते.                           

                 कार्यशाळेस यशवंत महाविद्यालय व नांदेड फार्मसी कॉलेज येथील १०० पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थी विदयार्थी सहभागी झाले होते.


                 कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यात सुधारणा करणे आणि उद्योगक्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणे होता. 

                 कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वती पूजनाने झाले. यावेळी कार्यशाळेचे समन्वयक डॉ. सुभाष बी.जुन्ने यांनी प्रास्ताविकात कार्यशाळेची रूपरेषा व उद्देश स्पष्ट केला. 

                सीआयसी समन्वयक डॉ.एस.पी. वर्ताळे  यांनी, यशवंत महाविद्यालयात असलेल्या अद्ययावत उपकरणांची माहिती दिली. विभागप्रमुख डॉ. एम. ए. बसीर यांनी, विभागात घेण्यात येणाऱ्या वेगवेगळया उपक्रमाविषयी माहिती दिली. 

                 प्रमुख अतिथी डॉ. एस. व्ही.कुबेरकर यांनी, रसायनशास्त्र विभागाची मागील ५० वर्षापासून संशोधन व शैक्षणिक कार्यातील प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले व कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रात उत्तम संधी मिळतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.        

                अध्यक्षिय समारोपात प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे यांनी, विद्यार्थ्यांनी कार्यशाळेतील संधीचा जास्तीत जास्त लाभ घेऊन भविष्यामध्ये संशोधन क्षेत्रात तसेच मोठमोठ्या औद्योगिक कंपनीमध्ये रोजगार प्राप्त करून आपल्या आई-वडिलांचे व महाविद्यालयाचा नावलौकिक करावा, असा संदेश दिला. 

                  याप्रसंगी डॉ.विजय भोसले यांची प्रोफेसरपदी पदोन्नती झाल्याबद्दल प्राचार्य डॉ.गणेशचंद्र शिंदे व डॉ.एस. व्ही. कुबेरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

                 याप्रसंगी व्यासपीठावर डॉ.एम. ए.बसीर यांची उपस्थिती होती. 

                कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय भोसले यांनी केले तसेच आभार देखील मानले. 

                 दोन दिवशीय कार्यशाळेमध्ये पहिल्या दिवशी डॉ.सुधीर कुंभार यांनी, 'बेसिक कन्सेप्ट अँड अप्लिकेशन ऑफ जीसीएमएस व एचपीएलसी' या विषयावर अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ औषधनिर्माणशास्त्र शाखेचे डॉ.टी.एम. कल्याणकर यांनी 'एनालायटीकल मेथडस इन् स्पेक्ट्रोस्कॉपी' विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. स्पेक्ट्रोफ्लोरोमीटर अँड इट्स एप्लीकेशन या विषयावर नांदेड फार्मसी कॉलेजचे डॉ.ए.बी.रोगे यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर प्रसन्नजीत पवार यांनी, अपलिकेशनस ऑफ अटोमिक ऑब्झर्शन स्पेक्ट्रोस्कॉपी विषयावर मार्गदर्शन केले. 

                 दुसऱ्या दिवशीच्या सत्रामध्ये ॲटॉमिक ऑब्झर्शन स्पेक्ट्रोस्कॉपी, जी सी एम एस, एच पी एल सी, यु व्ही ,आय आर स्पेक्ट्रोस्कोपी या सर्व उपकरणांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे सहभागी मुलांना तज्ञ मार्गदर्शकानी मार्गदर्शन केले. 

                  कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी उपप्राचार्य डॉ. हरिश्चंद्र पतंगे, डॉ.एम. ए. बशीर यांची उपस्थिती होती.

                 कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी  समन्वयक डॉ. सुभाष बी. जुन्ने, सीआयसी समन्वयक डॉ.संभाजी वर्ताळे, डॉ.विजय भोसले, डॉ.संदीप खांनसोळे, डॉ.शिवराज शिरसाट,डॉ.कविता केंद्रे, डॉ.निलेश चव्हाण, डॉ.दत्ता कवळे, प्रा.संतोष राऊत, डॉ.अनिल कुंवर, डॉ.मदन अंभोरे,प्रा.शांतुलाल मावसकर,  कर्मचारी आनंद चंदेल, किशनराव इंगोले, गोविंद शिंदे, विठ्ठल इंगोले, ज्ञानदेव साखरे, मारोती बत्तलवाड आदींनी परिश्रम घेतले.

                 कार्यशाळेच्या समारोप सत्राचे सूत्रसंचालन डॉ. संदीप खानसोळे यांनी केले तसेच आभार देखील मानले.


                  समारोप सत्रानंतर सहभागी विद्यार्थ्यांच्या सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवण्यात आल्या. प्रमाणपत्र वितरण समारंभाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

                   कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे आदींनी सहकार्य केले.

टिप्पण्या