यशवंत ' मध्ये 'विद्यार्थिनींसाठी जागरूकता' कार्यक्रमाचे आयोजन


नांदेड:( दि.३० जानेवारी २०२५)

                 यशवंत महाविद्यालयातील महिला सुधार व सुरक्षा समिती आणि पीएम उषा योजनेअंतर्गत  'विद्यार्थिनींसाठी जागरूकता' कार्यक्रमाचे आयोजन दि.३१ जानेवारी २०२५, शुक्रवार रोजी सकाळी ठीक १० वाजता करण्यात आले आहे.

                   या कार्यक्रमामध्ये मुलींच्या जागृतीविषयी तसेच सुरक्षितता, स्वयंसंरक्षण, मानसिक स्वास्थ्य याबद्दल विशेष अतिथींच्या व्याख्यानाचे आयोजन लॅंग्वेज लॅब, इंग्रजी विभागामध्ये करण्यात आले आहे.

                  कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे: पहिले सत्र : 'लिंग आणि स्वयसंरक्षण प्रत्येकासाठी महत्त्वाचे'

या सत्रामध्ये सौ. दैवशाला गिरी विद्यार्थिनींना लिंग आधारित भेदभाव, स्वयंसंरक्षणाचे महत्त्व आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबत जागरूकता कशी आवश्यकता आहे, यावर विशेष व्याख्यान देणार आहेत.

दुसरे सत्र: 'स्त्रियांचे जीवन कौशल्य व मानसिक स्वास्थ्य'

   या सत्रामध्ये सौ.मेघा पालकर स्त्रियांच्या मानसिक स्वास्थ्याबद्दल व जीवन कौशल्य विकसित करण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे तसेच विद्यार्थिनींच्या मानसिक विकासावर मार्गदर्शन करणार आहेत.

                 कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे भूषविणार आहेत. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ.हरिश्चंद्र पतंगे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

                   तरी या व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन समन्वयिका डॉ.मंगल कदम यांनी केले आहे.

टिप्पण्या