अधिक तास कामाची संकल्पना मालक‌धार्जिणी आणि निषेधार्ह! - आ .सचिन अहिर *




 

   मुंबई दि.१३: देशात पायाभूत सुविधा निर्माण करणा-या एका नामवंत कारखान्यातील मुख्य कार्यकारी अधिका-यांनी आपल्या कामगारांपुढे बोलतांना रविवारच्या सुट्टीत काम करणे किंवा आठवड्याचे ९० तास काम करण्यासंबंधी ऊधळलेली मुक्तफळे मालकधारर्जिणी,अमानवी आणि तिव्र निषेधार्ह आहेत,अशी सडेतोड प्रतिक्रिया राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष,आमदार सचिनभाऊ अहिर यांनी व्यक्त केली आहे.

   एल.अँड टी.चे‌‌, सीईओ सुब्रमण्यम यांनी नुकतीच रविवारच्या सुट्टीत काम करण्याची किंवा आठवड्याचे ९० तास काम करण्याची जी कामगारांपुढे बोलतांना संकल्पना मांडली आहे, त्याचे पडसाद सर्वत्र उमटले आहेत.सोशल‌ मांडियामधून तर या‌ विरुद्ध नकारात्मक सूर उमटून येत आहेत!

    कामगारनेते आमदार सचिन अहिर यांनी मुख्यकार्यकारी अथिक-यांच्या विचारांवर तिव्र नापसंती व्यक्त करतांना म्हटले आहे की, सुधारलेल्या जगाचे वर्ककल्चर इतके वेगाने बदलले आहे की,हा विचार संपूर्ण जगाला काळाच्या आड नेणारा आहे.१८८५ च्या सुमारास क्रांतीसुर्य ज्योतीबा फुले यांचे अनुयायी नारायण मेघाजी लोखंडे यांनी त्याकाळी "बॉम्बे मिल हॅन्डस असोसिएशन"ही कामगारांची भारतातील पहिली संघटना स्थापन करुन संघटनेच्या बळावर १० जून १८९० रोजी कामगारांना प्रथमच साप्ताहिक सुट्टी गिरणी मालकांकडून मंजूर करून घेतली.नारायण मेघाजी लोखंडे यांच्या लढ्यामुळे १८९१ मध्ये ब्रिटिश सरकारने फॅक्टरी ऍक्ट मंजूर केला.त्यातूनच कामगारांच्या अनेकविध प्रश्नाची सोडवणूक झाली.पूढे१९३८च्या सुमारास कामगार महर्षी गं.द.आंबेकर यांचे गिरणी कामगार चळवळीत पदार्पण झाले.त्यांनी उभ्या केलेल्या शांततामय मार्गाच्या लढ्यातून गिरणी कामगारांचे जीवनमान उंचावले.त्यांना कायद्याने स्वास्थ्य आणि सुरक्षितता लाभली. 

     मुंबईच्या गिरण्यांमधील कामगारांसाठी साप्ताहिक सुट्टी म्हणजे कामगारांच्या लढ्याचा विजय आहे.हा विजय मुख्य कार्यकारी अधिकारी (सुब्रमण्यम) हिरावून घेत‌ आहेत.नाहीतर यापूर्वी दिवस उजाडला की कामगारांची ड्युटी सुरू होई आणि दिवस मावळला की ड्युटी संपे.तेव्हा जे लढ्याने मिळविले ते गैरसमजापोटी गमावणार का ? हा प्रश्न या निमित्ताने उभा रहातो.कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांनी मिळविलेले पैसे कराच्या रूपाने खिशातून जाणार असतील तर अधिक तास कामाचा उपयोग काय? अनेक खारखा न्यातील कामगारांनी वर्षोनुवर्षे कामकरुन‌ पगार वाढतच नाही,अशा आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत. 

   कामगारांना शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्य लाभावे आणि दुस-या दिवसा पासून तो‌ अधिक सक्षमपणे काम करावा,या संकल्प नेतून रविवारच्या सुट्टीची संकल्पना जन्माला आली.हे विज्ञानानेही सिध्द केले आहे.तेव्हा या अमृततुल्य विचारालाच हे मुख्य कार्यकारी अधिकारी मूठमाती देत आहेत का? तेव्हा काहीही असले तरी रविवाची सुट्टी रद्द करणे किंवा आठवड्याला ९० तास काम करण्याची संकल्पना अमानवी आहे.कंत्राटी पद्धतीवरील कामाने पिचलेल्या कामगारांच्या जखमेवर मीठ चोळणारा हा प्रकार आहे.भारतीय वर्ककल्चर आणि कामगार चळवळ या अमानवी विचाराला कदापि मान्यता देणारा नाही,असा विश्वास कामगारनेते आमदार सचिन अहिर आपली प्रतिक्रिया देताना व्यक्त केला आहे.(आय.एल.ओ.) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने देखील अधिक तास कामाला मज्जाव केला आहे,ही गोष्टही निदर्शनास आणून दिली आहे. 

    मिळालेल्या माहितीनुसार आज भारतात ९.२ टक्क्यावर लोक बेरोजगार आहेत म्हणजे अंदाजे १३ कोटी लोकांच्या हाताला आज काम नाही,त्यात एक तृतियांश पदवीधरांचा समावेश होतो,अशा परिस्थितीत, पायाभूत सुविधा निर्मिती करणाऱ्या कारखान्यातील महत्वाच्या हुद्यावरीरल वरिष्ठांनी आपल्या कामगारांकडे अधिकतास कामाची मागणी करणे किती व्यवहार्य ठरते? याचा आधी विचार करावा,असेही सचिन अहिर यांनी पत्रकाच्या शेवटी म्हटले आहे!•••

टिप्पण्या