रविवारी व्हॉईस ऑफ मीडियाचा दर्पण दिन सोहळा; राष्ट्रीय अध्यक्ष संदिप काळे, जेष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांची उपस्थिती

गंगाखेड प्रतिनिधी

गंगाखेड येथील भारतासाह आंतरराष्ट्रीय स्तरावर पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी लढा उभारणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या वतीने रविवार १९ जानेवारी रोजी गंगाखेड शहरातील राजेश्वर फंक्शन हॉल येथे दर्पण दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास राष्ट्रीय अध्यक्ष संदिप काळे यांच्यासह राजकीय विश्लेषक, जेष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

जनसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडुन न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या पत्रकारांना पत्रकारिता करत आसतांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. पत्रकारांसमोर निर्माण होणाऱ्या समस्या कोण सोडवणार असा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा मात्र त्याच्या समोर कोणताच पर्याय दिसत नाही. कायम खिशात विस्तव घेवुन फिरणाऱ्या पत्रकाराच्या सुरक्षेसाठी कुठलीच उपाय योजना नसल्याने व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या गंगाखेड शाखेच्या वतीने तालुक्यातील सुमारे ४८ पत्रकार बांधवांना रविवार रोजी राष्ट्रीय अध्यक्ष संदिप काळे, राजकीय विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, कार्याध्यक्ष विजय चोरडिया, योगेंद्र दोरकर, मंगेश खाटीक, मुफ्ती मो. हारून नदवी, अजित कुंकूलोळ, सुरज कदम, विजय पाटील, सतिश रेंगे, सुरेश जंपनगिरे, गजानन देशमुख आदी मान्यवरांच्या उपस्थितीत १५ लाख रुपयांचा विमा कवच देत त्यांचा सपत्नीक सन्मान केला जाणार असुन गंगाखेड तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपूर्वी आपली लेखणी झिजवली अशा जेष्ठ पत्रकारांचा सत्कार करण्यात येणार आहे तर याप्रसंगी उपस्थित राहणाऱ्या अन्य पत्रकार मंडळीचा गौरव केला जाणार आहे. व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या वतीने आयोजीत या भव्य अशा कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असुन कार्यक्रमाच्या नियोजनासाठी वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी परिश्रम घेत आहे. गंगाखेड शहरात होत असलेल्या या कार्यक्रमास

जिल्ह्यातील व्हॉईस ऑफ मीडियाच्या सदस्यांसह अन्य पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष अन्वर शेख लिंबेकर, कार्याध्यक्ष संजय सुपेकर, सचिव गुणवंत कांबळे, दगडू सोमाणी, शिवाजी कांबळे, अली चाऊस, अंकुश कांबळे, एम. बी. भिसे, भिमराव कांबळे, भागवत जलाले, गोपाळ मंत्री, देवराव जंगले, शेख महेमूद, ज्ञानोबा कदम, रामप्रसाद ओझा, अनिल साळवे, राहुल साबणे, बालासाहेब कदम, प्रेम सावंत, देवानंद गुंडाळे, गोविंद रोडे, सिद्धोधन भालेराव, उद्धव चाटे, सय्यद सद्दाम, अँड. उत्तम काळे, मोसीन खान, संतोष कलिंदर, शेख उस्मान, अँड. विलास लांडगे, प्रभू राठोड, सिद्धार्थ हत्तीअंबीरे, प्रदीप गौरशेटे, वसंत गेजगे, राम पवार, भाऊसाहेब मकापल्ले, उमापती कुदमुळे, बिलाल तांबोळी, गजानन पारवे, उत्तम दसवंते, वामन ढोबळे, नामदेव गालफाडे, गंगाधर कांबळे, किशोर बचाटे, अँड. सविता चव्हाण आदींनी केले आहे.

टिप्पण्या