*यशवंतच्या रासेयो शिबिरात वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम उत्साहात संपन्न*



नांदेड :दि. १४  जानेवारी २०२५: 

          उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या उपक्रमानुसार विद्यार्थी- विद्यार्थिनींसाठी “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” हा उपक्रम यावर्षी दि.१ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार महाविद्यालयात राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थी- विद्यार्थिनींमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी व वाढविण्यासाठी यशवंत महाविदयालय व वाचन संकल्प महाराष्ट्राचा महाविद्यालय समिती आणि राष्ट्रीय सेवा योजना यांचे संयुक्त विद्यमाने “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” प्रेरणा पंधरवड्याच्या निमित्ताने मरळक येथे आयोजित विशेष वार्षिक शिबिरात 'माझ्या भारतासाठी युवक आणि डिजिटल साक्षरतेसाठी युवक' याविषयावर प्रमुख मार्गदर्शक ग्रंथपाल डॉ. कैलास एन.वडजे यांचे उद्बोधन व्याख्यान शिबिरार्थीसाठी आयोजित करण्यात आले होते. 

          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभागप्रमुख डॉ.संजय जगताप होते. विशेष अतिथी हिंदी विभागप्रमुख डॉ.एस.एस. पाईकराव व डॉ.एस.एम.दुर्रानी होते.

          मार्गदर्शनपर मनोगतामध्ये डॉ. कैलास एन.वडजे यांनी, वाचन संकल्प महाराष्ट्राचा या योजनेची पार्श्वभूमी विशद करताना वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर ठेवले. वाचनामुळे माणूस कवी, लेखक, शास्त्रज्ञ, इंजिनिअर , डॉक्टर, अधिकारी इ.होतो, जे कि राष्ट्रीय सेवावृत्तीचे व सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती चांगली होण्यासाठी महत्वाचे आहे तसेच यशवंत महाविद्यालय ग्रंथालयात उपलब्ध असलेले विपुल व समृद्ध वाचन साहित्याचे प्रकार व त्याचे वर्गीकरणानुसार ग्रंथालयातील स्थान याबाबत माहिती दिली. वाचनामुळे आयुष्यात येणारी विविध संधी आणि समृद्धी याचे अनेक उदाहरणे देऊन जीवनात व राष्ट्रीय सेवावृत्तीसाठी वाचनाचे महत्व विशद केले.  

           अध्यक्षीय समारोपामध्ये डॉ.संजय जगताप यांनी, त्यांचे कवी व लेखक होण्याचा प्रवास विशद केला. हे करताना वाचन किती महत्त्वाचे आहे, व त्यामुळे मानवचा बौद्धिक व सामाजिक परिपुर्ण विकास कसा होतो, या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. 

          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. आरती तिडके यांनी केले. प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ.कैलास इंगोले यांनी केले तर आभार कु.सविता निखाते यांनी मानले. 

          कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. राजरत्न सोनटक्के, प्रा. राजश्री भोपाळे, प्रा. अभिनंदन इंगोले, प्रा. श्रीराम हुलसुरे, प्रा. कांचन गायकवाड, नाना शिंदे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांनी अथक परिश्रम केले तसेच उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिराजदार व गजानन पाटील, डॉ.अजय गव्हाणे, जगन्नाथ महामुने आदींनी सहकार्य केले.

टिप्पण्या