नांदेड:( दि.१५ जानेवारी २०२५)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय, मराठी विभाग आणि वाचन संकल्प महाराष्ट्राचा महाविद्यालय समितीच्या वतीने आयोजित 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' या उपक्रमांतर्गत तायवाडे महाविद्यालय, कोराडी, नागपूर येथील मराठी विभाग प्रमुख डॉ.कोमल ठाकरे यांनी विचार व्यक्त केले.
अध्यक्षस्थानी माजी प्र- कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे होते.
डॉ.कोमल ठाकरे यांनी, विद्यार्थ्यांनी विविध कौशल्य आत्मसात करून वाचन, चिंतन, मनन यामधून भाषण, संभाषण, लेखन आणि सूत्रसंचालन यासारख्या कौशल्यांचा विकास होतो. विद्यार्थ्यांनी विविध माध्यमातून आपल्या अंगी या कौशल्याची जोपासना करावी. जेणेकरून समाज जीवनामध्ये वावरताना समर्थपणे रोजगाराच्या दृष्टीने या कौशल्याचा वापर करता येईल व समर्थपणे जीवन जगण्याची कला अवगत होईल, असे उद्बोधक विचार व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे म्हणाले की, यशवंत महाविद्यालय हे उपक्रमशील महाविद्यालय आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध माध्यमातून सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.यशवंतचे विद्यार्थी हे गुणवंत, ज्ञानवंत आहेत. यशवंत महाविद्यालयातील ई-ग्रंथालयाचा विद्यार्थ्यांनी पुरेपूर लाभ घ्यावा व आपल्या ज्ञानामध्ये भर घालावी व आपले व्यक्तिमत्व तयार करावे, असे विचार व्यक्त केले.
प्रारंभी मराठी विभागप्रमुख डॉ. संजय जगताप यांनी प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन डॉ.शिवाजी सूर्यवंशी यांनी केले तर आभार ग्रंथपाल डॉ.कैलास वडजे यांनी मानले.
कार्यक्रमास समिती सदस्य डॉ. शबाना दुर्राणी, प्रा.राजश्री भोपाळे, डॉ. विश्वाधार देशमुख आणि विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, डॉ.अजय गव्हाणे, नाना शिंदे आदींनी सहकार्य केले.

addComments
टिप्पणी पोस्ट करा