मराठवाडा युनायटेड पद्मशाली समाज संघटनेच्या कार्याध्यक्ष पदी व्ही. आर. चिलवरवार


-

नांदेड - मराठवाडा युनायटेड  पद्मशाली समाज संघटनेची बैठक मजूर छाप बिडी  कारखाना नांदेड येथिल कार्यालयात अखिल भारतीय युनायटेड पद्मशाली समाज संघटनेचे उपाध्यक्ष मा. गोपालसेठ गोरंट्याल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

          या बैठकीत पद्मशाली समाजाचे सक्रिय कार्यकर्ते तथा  मराठवाडा शिक्षक संघाच्या माध्यमातून शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडविणारे मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव चिलवरवार यांची मराठवाडा युनायटेड पद्मशाली संघटनेच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. अखिल भारतीय युनायटेड पद्मशाली  संघटनेचे उपाध्यक्ष,प्रसिद्ध उद्योगपती मा.गोपालसेठ गोरंट्याल  यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. त्याप्रसंगी मराठवाडा युनायटेड   पद्मशाली समाज संघटनेचे अध्यक्ष तथा मार्कंडेय  बँकेचे संस्थापक अध्यक्ष  मा. जगन्नाथ बिंगेवार, राज्य सचिव प्रा. शंकरराव कुंटूरकर, मराठवाडा सचिव एडवोकेट महेंद्र दासरवार, मराठवाडा युनायटेड युवक अध्यक्ष किशोर राखेवार, प्रौढ  जिल्हाध्यक्ष उमेश कोकुलवार, युवक जिल्हाध्यक्ष नंदकुमार  अडकटलवार, गजानन वासमवार, शिवराज दासरवार, गणेशजी गड्डम, श्रीनिवास माडेवार, जळबाजी गोंटलवार, नरसिंग गड्डपवार, गंगाधर बोड्डेवार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना गोपालसेठ गोरंट्याल यांनी समाजातील तळागाळातील समाज बांधवांच्या हितासाठी  कार्य करण्याचे आवाहन केले. मराठवाडा अध्यक्ष बिंगेवार  यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा व्यक्त करून आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून निष्प्रह पणे काम करून समाजाचा विकास साधण्याचा प्रयत्न करावे असे मत व्यक्त केले. मराठवाडा युवक अध्यक्ष राखेवार  यांनी 9 फेब्रुवारी होत असलेल्या वधु वर परिचय  मेळाव्यास सर्वांनी सहकार्य करून मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन केले. शेवटी आभार उमेश कोकुलवार यांनी मानले.

टिप्पण्या