पर्यावरण सरंक्षण गतिविधी मार्फत भारतात महाकुंभ मध्ये प्लास्टिक प्रदूषण कमी व्हावं यासाठी स्टील थाली व कापडी पिशवी अभियान राबविण्यात आले. नांदेड येथून 30 संकलन केंद्रात 9500 थाली व कापडी पिशवी भाविका मार्फत गोळा करून आज दत्त जयंती दिनी 14 डिसेंबर रोजी विधिवत पूजा करून ट्रक ने पाठविण्यात आले. गजानन महाराज मंदिर तरोडा नांदेड येथे स्वामी चिन्मय बालाजी मंदिर स्वामी प्रत्यानंद जी यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.असंख्य भाविक उपस्थितीत समर्पण पूजा करण्यात आली.श्री संतोष परळीकर गुरु यांनी पूजेचे पौरहित्य केले.
महाकुंभ 13 जानेवारी 2025 ते 26 फेब्रुवारी 2025 प्रयागराज येथे होत आहे. 45 कोटी भाविक या कुंभास भेट देणार आहेत. त्यांच्या जेवणाची व्यवस्था साठी स्टील थाली केल्यामुळे करोडा प्लास्टिक थाली मुळे होणार प्रदूषण थांबणार आहे.स्टील थाली प्रयागराज येथील भंडाऱ्यात वापरण्यात येणार आहेत, विविध आखाड्या मार्फत 10000 भंडाऱ्याच आयोजन करण्यात आले. संपूर्ण भारतात लाखो स्टील थाली, कापडी पिशवी संकलन झाले असून हे महाकुंभ प्रदूषण मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
पर्यावरण गतिविधी नांदेड विभाग संयोजक श्री दिपक मोरताळे, सनत जी महाजन, डॉ राजेंद्र पाटील, चंदा काबरा, धनंजय नलबलवार, संदीप कऱ्हाळे, संतोष परळीकर गुरु, अरुण पोपळे, राजेंद्र देवणीकर, एकनाथ घुले,दीपा तोषनीवाल,रुचि राठी,निशा अग्रवाल,उषा शर्मा,विमल चक्करवार,पूजा मोदी,कल्पना राठी,कल्पना चौधरी,किरण अग्रवाल, शांता काबरा,चौधरी, पांडे, ठाकूर व असंख्य भक्त उपस्थित होते.

addComments
टिप्पणी पोस्ट करा