*राष्ट्रीय मिल मजदूर संघांच्या वतीने कामगारांची एनटीसी मिल कार्यालयावर तीव्र निदर्शने!*




    मुंबई दि.२४: ‌‌मुंबईतील राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंडळाच्या चार गिरण्या तील कामगारांना देण्यात येणारा पगार गेल्या तीन महिन्यांपासून देण्यात आलेला नाही,त्यामुळे कामगारांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.कामगारांनी‌ केलेल्या मागणीनुसार आज‌‌ बेलार्टपियर येथील‌ एनटीसी मिल कार्यालयावर‌ राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने कामगारांची निदर्शने छेडण्यात आली 

    या प्रश्नावर एनटीसी व्यवस्थापनाने‌ वेळ काढूपणा केला,असा आक्षेप कामगारांनी घेतला.परंतु व्यवस्थापनाने या मागणीचा आम्ही सातत्याने पाठपुरावा केला होता,असे सांगितले.संबंधित संघाचे पदाधिकारी खजिनदार निवृत्ती देसाई,उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर,सुनिल‌ बोरकर, सेक्रेटरी शिवाजी काळे,साई निकम,सखाराम भणगे,प्रकाश‌ भोसले,दिपक राणे आदींच्या नेतृत्वाखाली कामगारांनी‌ एनटिसीचे व्यवस्थापकीय प्रमुख पी.कुंगुमाराजू  यांना जवळपास चार-तास घेराव घातला.

    केद्र‌ सरकारच्या अखत्यारीतील देशभरातील‌ २३ गिरण्या सन‌२०२० मध्ये‌ कोविड काळात लॉकडाऊनचे‌ निमित्त‌ करुन बंद करण्यात आल्या,त्यामधील अनेक गिरण्या सक्षम असून त्या अद्याप चालू करण्यात आलेल्या नाहीत.सचिनभाऊ अहिर यांच्या नेतृत्वाखाली आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या पुढाकाराने देशातील बंद २३ एनटीसी गिरण्यातील‌ कामगारांनी दिल्लीमध्ये आंदोलनही‌ झेडले‌‌ होते.दरम्यान राष्ट्रीय मिल मजदूर संघाने लॉकडाऊन‌पूर्वी सुस्थितीत चालणा-या मुंबईतील (१)टाटा,(२)इंदू क्र.५,(३)पोद्दार,(४)दिग्विजय या चार‌‌ गिरण्या पूर्ववत‌‌ चालवा अन्यथा‌‌ या गिरण्यांतील‌ कामगारांना पूर्ण पगार देण्यात यावा,असा मुंबई औद्योगिक न्यायालयात दावा दाखल केला होता.न्यायलयाने कामगारांना पगार देण्याचा निर्णय दिला होता.त्याची अंमलबजावणी न झाल्याने संघटनेने बेअदबी प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली  होती.तेव्हा कुठे अर्धा पगार दिला जात होता! निवडणूकपूर्वी सरकारने मागील सर्व पगार कामगारांना दिला. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून पगार देण्यास हात आखडता घेतला होता.त्यामुळे गिरणी कामगारांवर उपासमारीची पाळी आली,या परिस्थितीकडे  एनटीसी व्यवस्थापनाचे  संघटना पदाधिकाऱ्यांनी आज लक्ष वेधले आहे. 

   ‌‌ राष्ट्रीय मिल मजदूर संघाने, मुंबईतील सदर चार एनटीसी गिरण्यांचे‌ प्रकरण न्यायधीकरणासाठी NCLTनॅशनल कंपनी लॉ‌ ट्रिब्युनल कोर्टात दाखल केले आहे.संघटनेने याप्रश्नी सर्वच मार्गाचा अवलंब केला आहे. 

  केंद्र सरकार या गिरण्या पूर्ववत चालू  करेपर्यंत कामगारांना पूर्ण पगार मिळालाच पाहिजे,अशी मागणी कामगारांनी आजच्या आंदोलनाद्वारे घोषणा देत केली आहे.

   या प्रसंगी  एनटिसीचे व्यवस्थापकीय प्रमुख पी.कुंगुमाराजू यांना पदाधिका-यांच्या वतीने एक मागण्यांचे निवेदन देण्यात आले.त्यावेळी इंदू ५चे‌ महाव्यवस्थापक दीपक शर्मा उपस्थित होते.

    येत्या आठ दिवसांत निर्णय घेण्यात आला नाही,तर कामगार एनटीसी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडतील‌ असा‌ आंदोलनाद्वारे‌ शेवटी इशारा देण्यात आला आहे .••••••

टिप्पण्या