मुंबई पोर्ट अथोरिटी एससी, एसटी आणि ओबीसी वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने दिनांक ६ डिसेंबर २०२४ रोजी चैत्यभूमी परिसरातील शिवाजी पार्क येथे असोसिएशनच्या वतीने फळे वाटप आणि बिस्कीट वाटप हा कार्यक्रम करून बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली. बाहेर गावांवरून जे बंधू-भगिनी बाबासाहेबांच्या दर्शनासाठी येतात त्यांना मुंबईतील विविध संस्थांच्या वतीने भोजनदान तसेच फलदान, वैद्यकीय तपासणी आणि उपचार इ. विविध सोयी उपलब्ध करून बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात येते. त्यापैकी आमच्या असोसिएशनने सुद्धा फळे आणि बिस्कीट वाटप करून बाबासाहेबांना विनम्र पूर्वक अभिवादन केले सकाळी १० वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रथमता असोसिएशनचे सेक्रेटरी डॉ. सोनल हिरभगत यांच्या हस्ते भगवान बुद्धांना पुष वाहण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेले मुंबई प्राधिकरणचे माजी बोर्ड मेंबर श्री दत्ता खेसे यांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार घातल्यानंतर विद्यमान बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर असो.चे. कार्यकारी अध्यक्ष अंकुश कांबळे, गिरीश कांबळे आणि सरचिटणीस संजीवन थोरावडे तसेच उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि धूप पूजा करण्यात आली. नंतर फळे आणि बिस्कीट वाटपाला सुरुवात करण्यात आली, यावेळी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. त्याचप्रमाणे सभासदांचे नातेवाईक यांनी सुद्धा कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली, यावेळी बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी माजी बोर्ड मेंबर दत्ता खेसे, विद्यमान बोर्ड नंबर प्रदीप नलावडे तसेच कार्यकारी अध्यक्ष अंकुश कांबळे, गिरीश कांबळे आणि सरचिटणीस संजीवन थोरावडे यांनी बाबासाहेबांच्या थोर जीवनकार्यावर आपले विचार मांडले.डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या देशाचे युगपुरुष होते. बाबासाहेबांनी या देशावर अनंत उपकार केलेले आहेत .आर्थिक सामाजिक, राजकीय जल योजना त्याचप्रमाणे अनेक गोष्टीवर दूरदृष्टीपणा दाखवून या देशावर फार मोठे उपकार केलेले आहेत. तसेच भारताची राज्यघटना लिहून हा देश जगामध्ये आदर्श असा देश आहे हे बाबासाहेबांनी च्या घटनेवरून सिद्ध होते. असे वक्त्यांनी त्यांचे विचार मांडले व बाबासाहेबांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. आज देशामध्ये एकमेव अशी व्यक्ती आहे की त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो लोकांचा जनसमुदाय दादर या ठिकाणी चैत्यभूमीवर जमा होतो सर्व सर्व कामगार कर्मचारी बंधू-भगिनी स्वयंस्फूर्तीने लोकांची सेवा करत असतात तीच एक भूमिका घेऊन आपली असोसिएशन काम करत आहे सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकारी अध्यक्ष अशोक वडगावकर असोसिएशनचे संघटक सचिव विजय कांबळे, संजय बडेकर, प्रदीप कांबळे तसेच , खजिनदार प्रदीप नवरे उपाध्यक्ष जयंत कांबळे, सुरेश ओव्हाळ, बापू कांबळे, संजय बर्वे, विभा मोरे, अनिल कोळी तसेच संयुक्त सरचिटणीस अर्जुन कांबळे, एन् डी. जानराव, अशोक माळवी व इतर पदाधिकारी सुधाकर कोळी, दत्तात्रय गेजगे, विकास कोळी, श्रीधर मोहिते, बळीराम फुलझेले, प्रवीण काळे, सुधीर मकासरे, तुकाराम कोळी, राजेश जाधव, रतन कांबळे, राजेंद्र मोहिते, दीपक सोनवणे, गजेंद्र कोहचडे, राहुल अहिरे, समीर कसबे, विश्वास चव्हाण, नितीन यशवंते इ.नी
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप परिश्रम घेतले.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा