गोदी कामगार वेतनकरारास मंत्री महोदयांची मंजुरी*

भारतातील बंदर व गोदी कामगारांना १  जानेवारी २०२२  पासून लागू होणारा वेतन  करार २७  सप्टेंबर २०२४ रोजी मुंबई येथे संपन्न झाला असून, या वेतन कराराला केंद्रीय नौकानयन मंत्री मा.  श्री. सर्वानंद सोनोवाल यांनी मंजुरी दिली असल्याचे मंत्रालयाचे सचिव श्री. सुजित कुमार यांनी लेखी आदेशाने कळविले आहे. 

झालेल्या वेतन कराराची अंमलबजावणी त्वरित करण्यासाठी भारतातील प्रमुख बंदारांमध्ये सर्व कामगार संघटनांनी एकजुटीने आंदोलन केले.  मुंबई बंदरात ५ व १० डिसेंबर २०२४  रोजी दुपारी जेवणाच्या सुट्टीत मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन,  ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन, मुंबई पोर्ट ट्रस्ट रिटायर्ड  एम्प्लॉईज असोसिएशन, मुंबई पोर्ट ट्रस्ट वर्कर्स युनियन, शोअर अँड  फ्लोटिला वर्कर्स असोसिएशन,  मुंबई पोर्ट  प्राधिकरण स्थानिय लोकाधिकार समिती,  मुंबई पोर्ट ट्रस्ट  एससी एसटी वेल्फेअर असोसिएशन,  यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई बंदरातील सेवेत असलेले  कामगार,  सेवानिवृत्त कामगार व त्यांच्या कुटुंबियांनी आंबेडकर भवन आणि  मुंबई  पोर्ट  प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर तीव्र  निदर्शने केली होती. भारतातील मान्यताप्राप्त सहा गोदी कामगार महासंघांच्या नेत्यांनी सातत्याने पाठपुरावा करून व  कामगारांनी एकजुटीने केलेल्या आंदोलनामुळे हे यश प्राप्त झाले आहे. असे ऑल इंडिया पोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशनचे ( वर्कर्स )   जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी सांगितले.

आपला 

 मारुती विश्वासराव 

प्रसिद्धप्रमुख 

मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

टिप्पण्या