नांदेड:( दि.२३ डिसेंबर २०२४)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील संगीत विभागातर्फे पीएम:युएसएचए योजनेअंतर्गत सॉफ्ट कंपोनंट ऍक्टिव्हिटीनुसार दि.२८ डिसेंबर, शनिवार रोजी मुंबई विद्यापीठ, मुंबई येथील प्रा.डॉ.कुणाल एस.इंगळे यांचे ,'ख्याल शैली व सुगम संगीताच्या प्रभावी प्रस्तुतीकरणासाठी आवाज साधना व रियाजाची तंत्रे' या विषयावर सप्रयोग व्याख्यानाचे आयोजन शंकरराव चव्हाण स्मृतीसंग्रहालय, ऑडिटोरियम, व्हीआयपी रोड, नांदेड येथे करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे भूषविणार आहेत.
तरी या व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, संगीत विभागप्रमुख डॉ.शिवदास शिंदे, प्रा.संगीता चाटी, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील तसेच प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे यांनी केले आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा