बेगडी हिंदुत्ववाद्यांनी मणिपूर बद्दलही पुळका दाखवावा -डॉ. श्रावण रॅपनवाड


मुखेड दि.

भारतातील मणिपुर जळत असताना, उत्तर प्रदेशात अनेक हिंसेच्या घटना घडत असताना बांगलादेशातील घटनेबद्दल पुळका दाखवणाऱ्या बेगडी हिंदुत्ववाद्यांनी देशांतर्गत मणिपूर सारख्या विषयावर बोलावे असे आवाहन ओबीसी नेते तथा काँग्रेस प्रदेश सचिव भारतयात्री डॉ.श्रावण रॅपनवाड यांनी प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.

    नांदेड सह अनेक ठिकाणी आज बांगलादेशाच्या विरोधात काही हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रोश मोर्चा काढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते तथा काँग्रेस प्रदेश सचिव,भारत यात्री डॉ.श्रावण रॅपणवाड यांनी या आक्रोश मोर्चेला आव्हान देत प्रसिद्धीपत्रक काढले आहे. त्यात म्हटले आहे की बांगलादेशातील हिंदू लोकांवर होणाऱ्या अत्याचाराचे समर्थन कोणीही भारतीय करत नाही. तेथील हिंदूंना न्याय मिळालाच पाहिजे पण येथील काही बेगडे हिंदुत्ववादी बांगलादेशातील घटनेचा अतिरेक करून भारतातील वातावरण दूषित करीत आहेत. दुसऱ्या देशातील हिंदूंचा पुळका दाखवणाऱ्या या संघटनांनी मात्र देशातील अनेक महिन्यांपासून धगधगत असणाऱ्या मणिपूर राज्यातील परिस्थितीवर चकार शब्द काढले नाहीत. याशिवाय उत्तर प्रदेश, बिहार व इतर राज्यात घडणाऱ्या हिंसक घटनांचे पडसाद या हिंदुत्ववाद्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाहीत का? मणिपूर साठी कधी या संघटनांनी पुढाकार घेऊन आंदोलन का केले नाही? देशाबाहेरील अत्याचार कळतोय पण देशांतर्गत राज्यच्या राज्य जळत आहेत हे यांना दिसत नाही का? बांगलादेश पाकिस्तानच्यच हिंदूवर अत्याचार होतो का भारतात मणिपूरात हिंदू नाहीत का?असे प्रश्नही रॅपनवाड यांनी प्रसिद्धी पत्रकातून विचारले आहेत. देशात व राज्यात हिंदुत्ववादी संघटनांची ऐकणारे सरकार आहेत त्यांनी बांगलादेशच्या विरोधात ठोस पावले उचलावीत परंतु त्याचबरोबर मणिपूर राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावे म्हणून या हिंदुत्ववादी संघटनांनी केंद्र सरकारवर दबाव आणावा असा सल्लाही प्रसिद्धी पत्रकातून शेवटी डॉ. श्रावण रॅपणवाड यांनी दिला आहे.

टिप्पण्या