मुंबई कस्टम्समधून दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे स्वर्गिय जमादार बापू लक्ष्मण लामखडे यांच्या ४६ व्या पुण्यतिथी निमित्ताने ४ डिसेंबर २०२४ रोजी नविन सिमा शुल्क भवन येथे
मुंबई कस्टम्स ग्रूप सी' ऑफिसर्स युनियन व सीमाशुल्क भवनातील सर्व वरिष्ठ अधिकारी - कर्मचारीवर्ग यांच्या वतीने या महानायकाच्या प्रतिमेला व चौकातील नाम फलकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी श्री. नितीशकुमार सिन्हा, (मुंबई कस्टम्स झोन-। चे मुख्य आयुक्त), श्री. विवेक पांडे ( आयुक्त सामान्य - अतिरिक्त भार), श्री. अस्लम हसन, श्री प्रभात कमल रामेश्वरम, अतिरिक्त आयुक्त श्री अरविंद घुगे, श्री. अशोक कोठारी, उपायुक्त श्री.बिपीन जाधव, श्री. एस. सुरेश यांच्यासह ऑल इंडिया कस्टम्स ग्रुप सी ऑफिसर्स फेडरेशन व युनियनच्या पदाधिकाऱ्यांसह अध्यक्ष श्री. संतोष पेडणेकर व कस्टम डिपार्टमेंट मधील अनेक मान्यवर कर्मचारीवर्ग व मुंबई पोर्ट ट्रस्ट डाॅक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे माजी संघटक सचिव श्री. बाळकृष्ण लोहोटे उपस्थित होते.
बापूंच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा