१९ डिसेंबर रोजी मराठवाडा शिक्षक संघाचे शिक्षणाधिकारी (मा.) कार्यालया समोर धरणे आंदोलन.


धरणे आंदोलनात प्रचंड संख्येने  सहभागी होऊन आपला असंतोष व्यक्त करावा- सूर्यकांत विश्वासराव, 


नांदेड / प्रतिनिधी (१६ डिसेंबर) 


राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या राज्य शासनाकडे गेल्या अनेक वर्षा पासून प्रलंबित आसलेल्या विविध मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी व त्यामार्गी लावण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने संघटनेचे मार्गदर्शक पी.एस.घाडगे, व्ही.जी.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व संघटनेचे अध्यक्ष सुर्यकांत विश्वासराव, सरचिटणीस राजकुमार कदम यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार दि.१९ डिसेंबर रोजी मराठवाडा विभागातील सर्व माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी  कार्यालयासमोर दुपारी ४ ते सांय.६ यावेळेत लक्षवेधी धरणे आंदोलन आयोजित केले आहे. धरणे आंदोलनात  प्रचंड संख्येने सहभागी होऊन आपला असंतोष व्यक्त करावा असे आवाहन मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष व्ही. आर. चिलवरवार आणि जिल्हा सचिव आर. के वाकोडे यांनी केले आहे.  

            मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष व्ही. आर. चिलवरवार यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की,राज्यातील कर्मचाऱ्यांची अंशदायी पेंन्शन योजना रद्द करून सर्वांनाच जुनी पेंन्शन योजना लागू करावी, शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या २३ ऑगस्ट २०२४ च्या शासनादेशा नुसार शिक्षकांची बीएलओ तथा पर्यवेक्षक कामासह सर्व अशैक्षणिक कामातून मुक्तता करण्यात यावी. राज्यातील निकषपात्र विनाअनुदान शाळा, वर्ग आणि तुकड्यांना प्रचलित अनुदान सुत्रा नुसार 100% अनुदान देवून शिक्षकांची वेठबिगारी थांबवावी, सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा तिसरा व चौथा हप्ता अदा करावा,  शिक्षकांना १०,२०,३० ही तीन लाभांची आश्वासीत प्रगती योजना लागू करावी,इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शिक्षण विभागाकडून कायम स्वरुपाच्या वैयक्तिक मान्यता देण्यात याव्यात यासह  इतर अनेक मागण्यांसाठी  मराठवाडा शिक्षक संघ १९ डिसेंबर रोजी संघटनेचे मार्गदर्शक पी.एस.घाडगे, व्ही.जी.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व संघटनेचे अध्यक्ष सुर्यकांत विश्वासराव, सरचिटणीस राजकुमार कदम यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील सर्व माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी कार्यालया समोर लक्षवेधी धरणे आंदोलन होत आहे. नांदेड येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन होणार आहे.  तरी जिल्ह्यातील  सर्व माध्यमाच्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करावे असे अवाहन मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव, सरचिटणीस राजकुमार कदम, केंद्रीय उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवट्टे, कोषाध्यक्ष ए. बी. औताडे, सहसचिव  सौ. रेखा सोळुंके, जिल्हाध्यक्ष  व्ही.आर.चिलवरवार, सचिव आर के वाकोडे, जी.पी कौशल्य, ई डी पाटोदेकर, बी डी.जाधव, डी. बी. नाईक, आनंद मोरे, आर.पी वाघमारे, विजय खुनिवाड, राम येडते, अब्दुल हसीब आर. डी. पाटील, एम. एस. मठपती, जी. पी. बंडूरे, क्लायमेट अलाडा, नागोराव रायकोड, राजेश कदम, विजयालक्ष्मी स्वामी, उत्तम लाटकर,डाँ.विठ्ठल भंडारे, के जी  ईसादकर, विनोद भुताळे,संभाजी बुड्डे, प्रा. आनंद करणे,शिवानंद स्वामी, मोहन पिनाटे, उदय कदम, वसंत माने, लक्ष्मण कोंडावार, सी एम लंगडे, जे बी शिंदे, रमेश कराळे, दत्तात्रय कांबळे, सुनील कल्याणकर, भीमाशंकर सुपालकर, एस बी कपाटे, व्यंकट हुनगुंडे, विश्वास जाधव, राहुल कोल्हे, जी आर बडूरकर, आनंद सुरसे, बी जी घाटे, इनामदार सईद, मल्लिकार्जुन मठपती,यांच्यासह सर्व पदाधिकारी केले आहे.

टिप्पण्या