नांदेड: (दि.१६ डिसेंबर २०२४)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयात ३० वर्षापेक्षा अधिक सेवा दिलेले व दोन वर्ष विभागप्रमुख राहिलेले सेवानिवृत्त गणित विभागप्रमुख प्रा.भगवंतसिंघजी गुलाटी यांना प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
श्रद्धांजलीपर शोकसभेत प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी, प्रा. भगवंतसिंघजी गुलाटी हे गणितातील तज्ञ, विद्यार्थीप्रिय व उत्कृष्ट प्राध्यापक होते. प्राध्यापकपेशाशी अत्यंत प्रामाणिक असणारे व्यक्तिमत्व होते. क्रिकेट या खेळाबद्दलही त्यांना रस होता. या क्षेत्रात कार्यरत प्राध्यापक व सर्व कर्मचाऱ्यांसाठी त्यांची सेवा मार्गदर्शक आहे, अशी भावना व्यक्त केली.
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, डॉ.प्रवीणकुमार मिरकुटे, डॉ.अजय गव्हाणे, डॉ.वीरभद्र स्वामी, डॉ.बतुल्ला बालाजीराव, डॉ.ज्ञानेश्वर पुपलवाड, गुणवंत धर्माधिकारी नवनाथ धुमाळ, जगन्नाथ महामुने, श्याम पाटील, बालाजी देशमुख, प्रसाद सावंत आदींनीही श्रद्धांजली अर्पण केली.
addComments
टिप्पणी पोस्ट करा