मुंबई दि.१४: महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या स्थापनेत गं.द. आंबेकर यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे.त्यांचा विचार पुढे नेताना आंबेकरजींनी अंगिकारलेला त्याग आणि निष्ठा विसरून चालणार नाही.खरे तर तोच नव्या पिढी पुढील आदर्श आहे, असे विचार महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी येथे समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मांडले.
राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आद्य संस्थापक कामगार महर्षी स्व. गं.द. आंबेकर यांची साठावी पुण्यतिथी शुक्रवारी महात्मा गांधी सभागृहात संपन्न झाली.यावेळी कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर होते.सर्वप्रथम गं.द.आंबेकर यांच्या प्रतिमेला पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात येऊन,समई प्रज्वलित करण्यात आली आणि आंबेकरजींचे पुण्यस्मरण करण्यात आले.
कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी आपल्या भाषणात कामगार कल्याण मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देताना पुढे सांगितले की, राष्ट्रीय मिल मजदूर संघाने विविध क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करून कामगारांच्या सुप्त कला,क्रीडा गुणांना खऱ्या अर्थाने प्रोत्साहन दिले आहे.
सरचिटणीस गोविंदराव मोहिते आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हणाले,आंबेकरजींनी सर्वस्व वाहून कामगार संघटना उभी केली. म्हणूनच त्यांचे जीवन कार्य आजच्या पिढीचे लक्षद्वीप ठरले आहे.दत्तोपंत ठेणगी कामगार शिक्षण मंडळाचे प्रादेशिक संचालक चंद्रसेन जगताप प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना म्हणाले, आज अवघे पाच ते सहा टक्के कामगार संघटित आहेत आणि ९५-९४ टक्के कामगार असंघटित आहेत.त्यांना संघटित करण्याचे अवघड काम राष्ट्रीय मिल मजदूर संघाने हाती घेतली आहे, ही गोष्ट निश्चितच स्वागतार्ह आहे!
अध्यक्षस्थानावरून बोलताना अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर म्हणाले की,आंबेकरजींच्या स्मृतीसप्ताहाचे आयोजन केवळ मुंबई पुरते सिमीत राहून चालणार नाही, तर राज्यातील जिल्ह्या-जिल्ह्यात हा स्मृतीसप्ताह संपन्न व्हावयास हवा. नव्याने कामगार चोळवळीत पाऊल ठेवणा-या प्रत्येक कामगार संघटनेला त्यातून नवचैतन्य मिळाल्या शिवाय रहाणार नाही.सामान्य माणसाला आज ज्या अनेक सवलती मिळतात,त्या त्यांनी भरलेल्या करातून मिळत असतात,हे विसरून चालणार नाही,असेही सचिनभाऊ अहिर आपल्या भाषणात म्हणाले.
या प्रसंगी गं.द.आंबेकर आंतर मिल क्रिकेट स्पर्धेत अजिंक्य ठरलेल्या टाटा मिल संघ आणि अंतिम उपविजेयी पोदार मिल संघाला आंबेकर चषक आणि रोखबक्षीस पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.गं.द.आंबेकर कॅरम स्पर्धेत टाटा मिलच्या अभिषेक कदम याला प्रथम विजेता आणि पोद्दार मिलच्या विशाल सिगवेकर याला अंतिम उपविजेता म्हणून आंबेकर चषक आणि रोख बक्षीस अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते, यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.महिलांच्या रांगोळी,गायन,नृत्य,नेमबाजी,बकेट रिंग अशा जवळपास २० खेळाच्या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
आंबेकर प्रतिष्ठान कॉलेजच्या अन्य विजेत्या विद्यार्थ्यांनाही बक्षीस वितरण पार पडले.
कार्यक्रमाचे आभार खजिनदार निवृत्ती देसाई यांनी मानले.उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर,बजरंग चव्हाण,राजन लाड, सुनिल अहिर, शिवाजी काळे,किशोर रहाटे,साई निकम आदी पदाधिकारी त्यावेळी उपस्थित होते.या स्पर्धा क्रीडा प्रमुख उपाध्यक्ष सुनिल बोरकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली पार पडल्या, त्यांना अन्य पदाधिका-यांनी सहकार्य केले.इंडिया युनायटेड क्र.५ चे संघटनसेक्रेटरी सखाराम भणगे यांना कोल्हापूरच्या युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने"समाजरत्न पुरस्कार" मिळाल्या बद्दल अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर,सरचिट णीस गोविंदराव मोहिते यांच्या हस्ते शाल-श्रीफळ देऊन त्यांचा विशेष गुणगौरव करण्यात आला.या बक्षीस वितरण सोहळ्यात शाहीर खामकर आणि पार्टीने बहारदार कार्यक्रम करून कार्यक्रमात रंगत आणली.••••••
addComments
टिप्पणी पोस्ट करा