नवी मुंबईत सानपाडा येथे नवविधा भक्ती सेवा समिती हार्बर लाईन या समितीच्या ६व्या वर्धापनदिनानिमित्त १५ डिसेंबर २०२४ रोजी गायत्री चेतना केंद्र येथे भव्य दिव्य भजन स्पर्धा अगदी उत्साहात पार पडली.
या स्पर्धेत २२ भजन मंडळांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संत ज्ञानेश्वर माऊली भजन संस्थेचे अध्यक्ष श्री. हनुमंत तावरे महाराज, गायत्री चेतना केंद्राचे ट्रस्टी श्री. मनुभाई पटेल, नवी मुंबईचे उबाठा जिल्हाप्रमुख श्री. विठ्ठल मोरे, महानगर प्रमुख व माजी नगरसेवक सोमनाथ वासकर, उपजिल्हाप्रमुख श्री. प्रकाश पाटील, उपशहर प्रमुख श्री सुनील गव्हाणे, समाजसेवक शंकर दादा मोहिते, विभाग प्रमुख श्री. अजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नवविधा भक्ती सेवा समिती यांचे अनमोल सहकार्य मिळाले.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा