*युएसए आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विल्यम ख्रिस बिल यांनी दिले बेसबॉल खेळाचे प्रशिक्षण*


सेलू:               डायमंड ड्रीम्स अकॅडमी यूएसए, महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन, अहिल्यानगर बेसबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यामाने शिर्डीत संजीवनी विद्यापीठ यांच्या वतीने 

राष्ट्रीय स्तरावरील व्यावसायिक बेसबॉल स्पर्धेसाठी बेसबॉल खेळाडू आणि प्रशिक्षकांचे प्रशिक्षण शिबिर संजीवनी इन्स्टिट्यूट, कोपरगाव येथे दि. 11 डिसें. ते 14 डिसें. दरम्यान घेण्यात आले त्यात आपल्या परभणी जिल्ह्याचे खेळाडू म्हणून राष्ट्रीय खेळाडू यश खराटे, सत्यम बुरकुले आणि कुणाल चव्हाण यांनी तर प्रशिक्षक म्हणून राष्ट्रीय खेळाडू  निलेश माळवे यांनी सहभाग नोंदवला. व बेसबॉल क्रीडा प्रकाराचे धडे घेतले आहेत. महाराष्ट्र राज्यातील  92 खेळाडू आणि 25 प्रशिक्षक सहभाग नोंदवला.

      याप्रंसगी महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन उपाध्यक्ष इंद्रजित,  सहसचिव मकरंद को-हाळकर,  उपस्थित होते.

 उज्ज्वल कामगिरीबद्दल बेसबॉल जिल्हा सचिव शंकर शहाणे, गणेश माळवे, जिल्हा क्रीडा अधिकार कविता नावंदे,  संजय मुंढे, प्रशांत नाईक, संजय भुमकर आदी अभिनंदन केले  .

टिप्पण्या