भारतातील बंदर व गोदी कामगारांचा वेतन करार २७ सप्टेंबर २०२४ रोजी झाला असून, या वेतन कराराची अंमलबजावणी जानेवारी २०२५ पासून होणार आहे. असे ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांनी सांगितले.
मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या गोदी विभागातील आउटडोअर डॉक स्टाफच्या वतीने २० डिसेंबर २०२४ रोजी इंदिरा गोदीतील हमालेज बिल्डिंगमधील स्टाफ ऑफिस कार्यालयात श्री. सत्यनारायणाची महापूजा संपन्न झाली. याप्रसंगी पूजा समितीच्या वतीने आलेल्या पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की , गोदी कामगारांनी निदर्शनासारखी अनेक आंदोलने करून संपाची धमकी दिल्यानंतर गोदी कामगारांच्या एकजुटीमुळे १ जानेवारी २०२२ पासून लागू होणारा वेतन करार संपन्न झाला. आता गोदीमध्ये कायम कामगारांची संख्या कमी झाली असून, कंत्राटी कामगारांची संख्या वाढत चाललेली आहे. त्यामुळे आता कंत्राटी कामगारांना संघटित करणे ही काळाची गरज आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्पलॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी आपल्या भाषणात सांगितले की, गोदी विभागातील कर्मचारी गेली वर्षानुवर्ष श्री. सत्यनारायणाची महापूजा आयोजित करीत असून गोदी कामगारांचे कौटुंबिक स्नेह सम्मेलन देखील आयोजित केले जाते. यावेळेस गोदी कामगारांच्या वेतन कराराच्या वाटाघाटी करताना अनेक अडचणी आल्या, परंतु त्यामधूनही मार्ग निघून गोदी कामगारांसाठी अतिशय चांगला वेतन करार झाला. मात्र वडाळा येथील हॉस्पिटल, पोर्ट ट्रस्ट वसाहत व फायर ब्रिगेडच्या कंत्राटी कामगारांवर अन्याय होत असून या कंत्राटी कामगारांना गेले तीन महिने पगार दिले नाही. याची खंत आम्हाला आहे. ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे जनरल सेक्रेटरी केरसी पारेख यांनी आपल्या भाषणात सांगितले की, गोदी कामगारांचा एक दिवस देखील वाया न जाता आणि दूरदृष्टी नेतृत्व व गोदी कामगारांची एकजूट यामुळे गोदी कामगारांना भरघोस पगार वाढ मिळाली आहे. याचे सर्व श्रेय गोदी कामगारांच्या एकजुटीला जाते. याप्रसंगी मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर व मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे उपाध्यक्ष प्रदीप नलावडे, बोर्ड मेंबर ज्ञानेश्वर वाडेकर, माजी बोर्ड मेंबर व युनियनचे सेक्रेटरी दत्ता खेसे, प्रसिद्धी प्रमुख मारुती विश्वासराव, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे सेक्रेटरी बबन मेटे, उपगोदी प्रबंधक स्वामी, मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानिय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनकुटकर, विजय सोमा सावंत आणि इतर मान्यवरांनी शुभेच्छापर भाषणे केली. कार्यक्रमास मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी विजय रणदिवे, मनीष पाटील, संघटक चिटणीस आप्पा भोसले, बापू घाडीगावकर, प्रदीप गोलतकर, पुजा समितीचे अध्यक्ष संदीप घागरे व विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुजा समितीचे पदाधिकारी संदेश मोरे यांनी केले.
आपला
मारुती विश्वासराव
प्रसिद्धी प्रमुख
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन
addComments
टिप्पणी पोस्ट करा