*चिल्ड्रन्स अकॅडमी ठाकूर कॉम्प्लेक्स शाळेला तिहेरी मुकुटाचा मान.*



मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत चिल्ड्रन्स अकॅडमी ठाकूर कॉम्प्लेक्स शाळेने दुर्गादेवी सराफ चषकावर आपले नाव कोरले. अंतिम सामन्यात त्यांनी चिल्ड्रन्स अकॅडमी मालाड संघाचा 25- 5 , 25- 23 असा दोन सरळ सेटमध्ये पराभव केला. 12वर्षाखालील मुलींच्या अंतिम सामन्यात चिल्ड्रन्स अकॅडमी ठाकूर कॉम्प्लेक्सनेच बाजी मारली .त्यांनी चिल्ड्रन्स अकॅडमी अशोक नगर चा 25- 11, 26- 24 असा सरळ सेटमध्ये पराभव करून श्री डब्ल्यू ए करकाडा मेमोरियल ट्रॉफी वर आपले नाव कोरले. तसेच 14 वर्षाखालील मुलांच्या अंतिम सामन्यात चिल्ड्रन्स अकॅडमी ठाकूर कॉम्प्लेक्सने चिल्ड्रन्स अकॅडमी अशोक नगर चा 22- 25 , 25 -20,  16- 14 असा पराभव करून टाईट नट अँड बोल्ट ट्रॉफीवर आपले नाव कोरले .14 वर्षाखालील मुलींच्या अंतिम सामन्यात एम. आर. सिद्दिकी चषक सेंट लॉरेन्स हायस्कूल बोरिवलीने पार्ले तिलक विद्यालय आयसीएसइ चा  25 -5, 25 -18 असा दोन सरळ सेटमध्ये पराभव करून पटकावला. सोळा वर्षाखालील मुलांच्या अंतिम सामन्यात एफ.बी. मास्टर मेमोरियल चषक चिल्ड्रन्स अकॅडमी अशोक नगरने आर्य विद्या मंदिर जुहू चा 25- 10,  23 - 25,  15 -3 गुणांनी पराभव करून जिंकला. मुलींच्या 16 वर्षाखालील अंतिम सामन्यात चिल्ड्रन्स अकॅडमी मालाड ने चिल्ड्रन्स अकॅडमी अशोक नगर चा 25 -13, 25- 23 गुणांनी पराभव करून अपोस्ट्रोलिक कारमेल ट्रॉफीवर आपले नाव कोरले.यावर्षी प्रथमच हॉलीबॉल स्पर्धा लीग कम नॉक आऊट बेसिस वर आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धा दिनांक 9  ते 13 डिसेंबर या कालावधीत शिशुवन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स माटुंगा येथे आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे मिंटोनी प्लस अकॅडमीचे को- फाउंडर श्री शिजु लोनापन व विशेष अतिथी म्हणून विक्रोळीच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुजाता घोडके मॅडम याही आवर्जून उपस्थित होत्या. एम एस एस ए हॉलीबॉल सेक्रेटरी श्री राजाराम बाळू पवार इंडियन गेम सेक्रेटरी श्री डी. डी .शिंदे बास्केटबॉल सेक्रेटरी श्री महेंद्र रामचंद्र जंगम तसेच मिंटोनी प्लस अकॅडमीचे श्री अतुल सावडावकर व किशोर सावंत हेही या पारितोषिक वितरण समारंभासाठी उपस्थित होते.

आपला 

मारुती विश्वासराव

..

टिप्पण्या