माझ्याकडे लोक येतात. मला विचारतात, ध्यान केल्याने लाभ काय होणार? ध्यानामध्ये देखील लाभ..... तुम्ही तर चुकीची गोष्ट विचारत आहात. ध्यानामध्ये लाभ लोभ सोडून जातात, तर पोहोचताल. असं नाही की ध्यानामध्ये लाभ नाही; परम लाभ आहे. मात्र तुम्ही लाभ लोभाच्या भाषेने गेलात, तर ध्यानामध्ये जाऊच शकणार नाहीत. तेव्हा तर तुम्ही कोणाकडून कंठ-तावीज घेताल, कोणाकडून कान फुंकून घेताल , कोणत्यातरी मदारीच्या चक्करमध्ये पडताल; कारण तुम्ही लोभ आणि लाभ पकडलेले आहे.
ध्यानाच्या जगात लोभ आणि लाभाची भाषा आणू नये. ध्यानाच्या जगामध्ये तर तो प्रविष्ट होईल, जो म्हणेल खूप लोभ लाभ करून पाहिला आणि काहीच प्राप्त झाले नाही, आश्वासन खूप मिळाले; पूर्ण कोणतेच झाले नाही, खूप खोट्या गोष्टी सोबत चालून पाहिले; काहीच प्राप्त झाले नाही. प्राप्त करण्याची धावच व्यर्थ झाली. इतक्या विषादाने भरलो की, पराजित झालो. तो असे म्हणतो की, आता आणखीन नाही धावणार. आता मला अशा दशेमध्ये पोहोचवा की, कोणताही लोभ राहणार नाही. कोणताही लाभ राहणार नाही. कोणती धावपळ राहणार नाही. कोणतीही वासना आणि तृष्णा राहणार नाही. अशा मनाच्या दशेची छोटीशी झलक प्राप्त होईल; जिथे मी स्वतःमध्ये तृप्त होऊन जाईल. माझी कोणतीही मागणी राहणार नाही. तेव्हा तुम्ही ध्यानामध्ये जाऊ शकाल.
मात्र तुम्ही चुकीचाच प्रश्न विचारता. तुम्ही चुकीचा प्रश्न विचारला तर कोणी ना कोणी चुकीचे उत्तर देऊन तुम्हाला प्रलोभन देणारा तुम्हाला भेटून जाईल. तुम्हाला भेटून जाईल कोणी ना कोणी तुमच्या गळ्याला फाशी देणारा. तो म्हणेल, ठीक आहे तुम्हाला लाभ पाहिजे. मी लाभ देईल. तुम्हाला व्यवसायामध्ये, रोजगारामध्ये बढती मिळेल. लवकरच बढती मिळेल जर ध्यान करताल.
ह्या व्यर्थ बाबी आहेत, मात्र यांना देखील सांगणारे लोक भेटतील...... जर समजा तुम्ही लोभाची भाषा केली की, सत्याची भाषा होऊ शकत नाही. खोट्याची भाषा बोलावी लागते. लोभाची भाषा खोट्याची भाषा आहे. तुम्हाला फक्त लोभ लक्षात येतो; म्हणून खोट्या बाबी प्रभावित होतात आणि मग एकेक इंच दुसऱ्या बाबी पाठोपाठ येतात.
ध्यानाचा अप्रत्यक्ष परिणाम होत असतो; मात्र त्याला सरळ ध्यानासोबत जोडले जाऊ नये. हे सत्य आहे की, जर समजा तुम्ही ध्यानी झाले तर तुमच्या जीवनात यशस्वीता प्राप्त होईल; यामध्ये काहीच शंका नाही. यामुळे नाही की, ध्यानाचा यशस्वीतेशी काही संबंध आहे. पण यासाठी की, ध्यान तुम्हाला शांत करेल आणि शांत माणूस जे काही करेल, जसे काही करेल; त्यामध्ये चुका कमी होतील. ध्यान शांतता देईल; यशस्वीता नाही. नोकरीमध्ये प्रगती देणार नाही. ध्यान शांती देईल. परम विश्रांती देईल. त्याचा परिणाम होईल. त्याचा परिणाम तुमच्या सर्व जीवनावर होईल. तुम्ही जर चित्रकार असाल तर तुम्ही उत्कृष्ट चित्रकार बनाल, जर तुम्ही मूर्तिकार असताल तर तुमची मूर्ती नव्या रंग रूपामध्ये प्रगट होईल, जर तुम्ही संगीतज्ञ असाल तर तुमच्या संगीतामध्ये नवीन प्राण येतील, जर तुम्ही दुकानदार असाल तर ग्राहकांसोबत तुमचे मधुर संबंध प्रस्थापित होतील, जर तुम्ही शिक्षक असताल तर ज्या मुलांना तुम्ही शिकवता त्यामध्ये एक दर्जा आणि तज्ञता प्राप्त होईल. मात्र हे सर्व अप्रत्यक्ष परिणाम आहेत. यांना सरळ सरळ ध्यानाशी जोडणे चुकीचे आहे. सरळ सरळ जोडले की चूक झाली.
जेव्हा मला कोणी विचारते, ध्यानाने काय लाभ होणार? मी त्यांना म्हणतो, कोणताच लाभ होणार नाही; कारण हा जर लाभाची गोष्ट विचारणार असेल तर ध्यान तर हा कधी करणारच नाही. लाभाच्या चिंतेमध्ये डुबलेला माणूस ध्यानच करणार नाही आणि ध्यान करणार नाही तर लाभ कसा होईल? आता ही खूप गूढ बाब आहे, असं समजू नका. ही बाब एकदम साधी सरळ आहे. जो माणूस लाभाची भाषा सोडून देईल; त्यालाच ध्यानापासून लाभ मिळेल. यामुळेच ध्यानी लोकांनी कधीच नाही सांगितले की, लाभ होईल. ते एकदम शांत राहिले. ते म्हणाले, लाभाची भाषा सोडून द्या; तर ध्यान होईल आणि ध्यान घटले की सर्व काही होईल. तुम्ही फक्त पाठीमागे जा....... ज्याची दृष्टी धनावर आहे; तो ध्यान कसे शोधेल? जो अजून पर्यंत धनापासून उबगलेला नाही; तो ध्यान कसे शोधेल.
हे तर सत्य आहे, जो ध्यानाला प्राप्त होईल, त्याच्या सर्व व्यवहारावर एक प्रकारचे वलय निर्माण होईल. जे करेल, जसे करेल; त्यामध्ये कुशलता प्राप्त होईल. मन जेव्हा शांत असते तेव्हा त्याची सावली जीवनातील सर्व व्यवहारावर पडत असते. व्यवहारांमध्ये रूपांतरण होत असते. मात्र ती गोष्ट बोलण्याची नाही ती गोष्ट बोलली तर ध्यान होणार नाही.
अनुवादक:
*-प्रा.डॉ.अजय गव्हाणे,*
राज्यशास्त्र विभागप्रमुख,
यशवंत महाविद्यालय, नांदेड.
addComments
टिप्पणी पोस्ट करा