नियमित जलतरण ही उत्कृष्ट जीवनशैली* प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे


 नांदेड:( दि.१७ डिसेंबर २०२४)

           सध्याच्या ताण-तणाव व धकाधकीच्या काळात प्रत्येक व्यक्तीने आरोग्यदायी जीवनासाठी व्यायाम करणे अनिवार्य आहे. जलतरण या क्रीडा प्रकाराने सर्वांगीण व परिपूर्ण व्यायाम होतो. नियमित जलतरण ही उत्कृष्ट जीवनशैली असल्याचे प्रतिपादन माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी केले.

           यशवंत महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख व जलतरणपटू डॉ.अजय गव्हाणे यांना मास्टर्स गेम्स असोसिएशन, महाराष्ट्रतर्फे आयोजित स्व.मीनाताई ठाकरे स्टेडियमअंतर्गत स्व.श्रीकांत ठाकरे जलतरणिका येथे दि.१४ डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या पाचव्या राज्यस्तरीय मास्टर्स गेम्स २०२४, नाशिक येथील २०० मीटर्स वैयक्तिक मिडले जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त झाल्याबद्दल महाविद्यालयात आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.

           याप्रसंगी यशवंत महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ.एम.एम.बेटकर,  औसा, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, वनस्पतीशास्त्र  विभागप्रमुख डॉ.श्रीरंग बोडके, कनिष्ठ महाविद्यालयातील समाजशास्त्राचे प्रा.ओमप्रकाश गुंजकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

           या सत्कार सोहळ्यास अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयीका डॉ.एल.व्ही.पदमाराणी राव, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील तसेच प्राध्यापक आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

टिप्पण्या