*ध्यान आणि आरोग्य

        औषधीशास्त्र मनुष्याच्या आजाराकडे ऑटोमिक, आण्विक दृष्टीने पहाते.औषधीशास्त्र मनुष्याच्या एका एका आजाराला वेगवेगळ्या पद्धतीने उपचार करण्याचा प्रयत्न करते. औषधीशास्त्र एका एका रोगाला आण्विक मानते. मात्र ध्यान मनुष्याला एक संपूर्ण आजार मानते. एका एका रोगाला नाही.ध्यान मनुष्याच्या व्यक्तित्वालाच एक आजार म्हणून मानते. औषधीशास्त्र मनुष्याला  आजार होतात, ते विजातीय आहेत,परकीय आहेत,असे मानते.

          मात्र हळूहळू हे अंतर कमी झाले आणि हळूहळू औषधीशास्त्राने सुद्धा असे म्हणणे सुरु केले की, डोन्ट ट्रीट द डिजिज, ट्रीट द पेशंट. आजाराचा इलाज करू नका; आजारी व्यक्तीचा इलाज करा. नका करू आजाराचा इलाज जो आजारी झाला आहे त्याचा इलाज करा; ही फार मौल्यवान गोष्ट आहे. कारण की याचा अर्थ असा आहे की आजारपणा सुद्धा आजारी व्यक्तीच्या जीवन जगण्याची एक शैली आहे. जीवन जगण्याचा एक मार्ग आहे. प्रत्येक  माणूस एकसारखा आजारी होऊ शकत नाही. आजारपणा सुद्धा स्वतःचे वेगळेपण धारण करत असते, स्वतःचे व्यक्तित्व बाळगत असते. असं नाही आहे कि मी क्षयरोगाने, टी.बी.ने आजारी पडलो आणि तुम्ही सुद्धा आजारी पडले, तेव्हा आम्ही दोघेही एकाच प्रकारे आजारी असू. आमचा क्षयरोग सुद्धा दोन वेगवेगळ्या प्रकाराचा असेल, कारण की आम्ही दोन वेगवेगळे व्यक्ती आहोत.आणि असे होऊ शकते की ज्या उपचाराने माझा क्षयरोग बरा झाला तो उपचार तुमच्या क्षयरोगाला बरे करू शकणार नाही. याकरीता फार खोलवर आजार  नाहीये ,फार खोलवर आजारी व्यक्ती आहे.

           औषधीशास्त्र, मेडीसिन  मनुष्याच्या फक्त वरवर दिसणाऱ्या आजाराला पकडतो. ध्यान, ध्यानाचे शास्त्र माणसाला अतिशय खोलवर समजून घेऊन त्याचे निदान करतो. याला असे म्हणले पाहिजे की औषध माणसाला केवळ वरवर स्वस्थ करण्याचा प्रयत्न करते. मात्र ध्यान माणसाला आतून, अंतरंगातून स्वस्थ करण्याचा प्रयत्न करते. ध्यान औषधीशास्त्राशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही आणि औषधीशास्त्र सुद्धा ध्यानाशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही. खऱ्या अर्थाने जर पाहिले तर मनुष्याचे शरीर आणि मनुष्याचा आत्मा हे एकाच गोष्टीचे दोन किनारे आहेत. जर ठिक अर्थाने आम्ही काही सांगण्याचा प्रयत्न तर  असं नाही म्हणू शकत की शरीर प्लस आत्मा असा माणूस आहे.असं नाहीये. माणूस सायकोसोमॅटीक आहे, किंवा सोमेटोसायकिक आहे. माणूस  मन- शरीर आहे, किंवा शरीर- मन आहे.

----------------------------------------------

*ग्रंथ: हसिबा खेलीबा दरिबा ध्यानम्*

*भगवान रजनीश (ओशो) प्रवचन-१*

----------------------------------------------

           मानवी आरोग्याच्या कक्षेतील सर्वात महत्वाचे तत्व ' ध्यान' हे आहे. जगातील सर्व धर्मांत उपासनापद्धतीबाबत भिन्नता असली तरी ध्यानधारणेबाबत सर्वजण समान तत्त्व धारण करून आहेत. ध्यान हा विषय मानवी जीवनातील अतिशय महत्त्वाचा विषय जागतिक कीर्तीचे तत्त्वज्ञ विचारवंत सद्गुरू भगवान रजनीश (ओशो) यांनी मानला आहे व मानवी जीवनात ध्यानाला प्राथमिकता असावयास हवी, असे प्रतिपादन केले आहे. 

         भगवान रजनीश (ओशोंनी) आयुष्यभर दिलेल्या प्रवचनांचे ६५० ग्रंथांमध्ये रुपांतर झाले आहे व जगातील सर्वच भाषांमध्ये त्याचे अनुवादही झाले आहे. ध्यान, आरोग्य आणि औषधीशास्त्र या आधुनिक काळातील अतिशय महत्त्वाच्या विषयावरील हे ' हसिबा खेलीबा दरिबा ध्यानम्'  या ग्रंथातील संक्षिप्त विवेचन आहे.

           *संकलन व शब्दांकन -*

          *- प्रा.डॉ.अजय वसंतराव गव्हाणे,*

            यशवंत महाविद्यालय, नांदेड.

----------------------------------------------

टिप्पण्या