श्री दत्त जन्म सोहळा उत्साहात भक्ती भावात संपन्न

श्रीक्षेत्र माहूर गडावर लाखो भाविकांनी आनंदात घेतले श्री दत्तप्रभू चे दर्शन 


श्री आनंद दत्तधाम आश्रमात हजारोच्या संख्येने भाविकांनी घेतला आमरस पुरणपोळीचा महाप्रसाद


श्रीक्षेत्र माहूर इलियास बावाणी


श्रीक्षेत्र माहूर गडावरील श्री दत्त शिखर संस्थान सह येथील अनेक मंदिर मठावर श्री दत्तप्रभूंचां जन्मोत्सव सोहळा मोठ्या आनंदाने भक्ती भावात पार पडला परंपरेप्रमाणे दत्त जन्म सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी लाखावर भाविकांनी थंडीची तमा न बाळगता दत्ता दिगंबराया हो मला भेट द्या हो अशा जय घोषात तासन  तास रांगेत उभे राहून दत्त जन्म सोहळ्याचा आनंद घेतला श्री दत्त शिखर संस्थान येथे विधिवत पूजा अर्चा करत परमपूज्य महंत मधुसूदन भारती यांच्या हस्ते दत्तप्रभूंचा पाळणा हलवून दत्त जन्म सोहळ्यास सुरुवात करण्यात आली


दरवर्षीप्रमाणे माहूर गडावरील श्री दत्त शिखर संस्थान येथे दत्त जन्म सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थित परंपरेप्रमाणे मोठ्या भक्ती भावात साजरा होतो दत्त जयंतीच्या निमित्ताने माहुर गडावरील श्री दत्त शिखर संस्थान येथे दिनांक 11 ते 16 पर्यंत दत्त जन्म सोहळ्याचे पारंपारिक कार्यक्रम पार पडणार आहेत त्या निमित्ताने दिनांक 14 रोजी श्री दत्त शिखर संस्थान येथे दुपारी बारा ते तीनच्या दरम्यान दत्त जन्म सोहळ्यात सुरुवात करण्यात आली यावेळी लाखो भाविक उपस्थित होते यावेळी परमपूज्य महंत श्री मधुसूदन भारती यांच्या हस्ते मुख्य मंदिरात दत्त जन्म सोहळा साजरा करण्यात आला यावेळी त्यांच्या हस्ते पाळण्यात असलेल्या श्री दत्त मूर्तीचा पाळणा हलवून विधिवत पूजाअर्चा करून दत्तजन्म सोहळा साजरा करण्यात आला त्यानंतर आलेल्या लाखो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले


गडावरील श्री आनंद दत्तधाम आश्रमात मठाधीश राष्ट्रसंत साईनाथ महाराज वसमतकर बीतनाळकर बरबडेकर यांच्या हस्ते दत्त जन्म सोहळा साजरा करण्यात आला तसेच येथे मोठ्या भक्ती भावात किर्तन झाल्यानंतर आलेल्या हजारो भाविकांना आमरस पुरणपोळी सह तुपाचा महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळी भाविकासह बंदोबस्तासाठी आलेल्या सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते तहसीलदार डॉ राजकुमार राठोड सपोनि शिवप्रकाश मुळे यांचे सह सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस ठेवला होता गटविकास अधिकारी सुरेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील टी पॉईंट येथे आलेल्या हजारो भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांचे सर्व कर्मचाऱ्यांनी गडावरील जंगलात भाविकांना कुठलीही इजा होऊ नये म्हणून ठिकठिकाणी कर्मचारी नियुक्त केले होते तर तालुका आरोग्य अधिकारी डॉ माचेवार वैद्यकीय अधीक्षक डॉ किरण वाघमारे यांचे सह नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी मुख्याधिकारी विवेक कांदे कार्यालय अधीक्षक वैजनाथ स्वामी यांचे सह सर्व कर्मचाऱ्यांनी पार्किंग सह स्वच्छता दिशादर्शक फलक पाणी यासह भाविकांना लागणाऱ्या सर्व सुविधा व्यवस्थित पुरविल्याने फक्त जन्म सोहळ्याचा दिवस निर्विघ्न पार पडला

टिप्पण्या