'कष्टाची फळे गोड' ह्या पुस्तकाला उत्कृष्ट बालसाहित्याचा पुरस्कार

नांदेड दि. २१

ज्येष्ठ बालसाहित्यकार डॉ. सुरेश सावंत यांनी लिहिलेल्या आणि दिलीपराज प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या 'कष्टाची फळे गोड' ह्या बालकथासंग्रहाला उत्कृष्ट बालसाहित्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 

करवीर संस्थानात आजरा (कोल्हापूर) येथे १८८९मध्ये स्थापन झालेली श्रीमंत गंगामाई वाचनमंदिर ही संस्था यंदा आपल्या स्थापनेचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करते आहे. ह्या संस्थेतर्फे दरवर्षी दर्जेदार कलाकृतींना राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार देण्यात येतात. यंदाच्या उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कारासाठी 'कष्टाची फळे गोड' ह्या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे.

साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक कृष्णात खोत यांच्या हस्ते २५ डिसेंबर रोजी डॉ. सावंत यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

डॉ. सुरेश सावंत यांची बालसाहित्याची ३१ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. डॉ. सावंत यांचे साहित्य विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाले आहे.

टिप्पण्या