मुंबई - भारतीय रेल्वेत ४-६ डिसेम्बर, २०२४ रोजी रेल्वेच्या कामगार युनियनच्या मान्यतेची निवडणूक झाली ह्या निवडणुकीत वेगवेगळ्या संघटनानी भाग घेतला. हि निवडणूक नॅशनल रेलवे मजदूर युनियनला आव्हानात्मक होती, नेशनल रेल्वे मजदूर युनियन कामगारांच्या विश्वासावर एकटी आपल्या दमात मान्यताच्या निवडणुकीत उभी होती. परंतु या आव्हानाला सडेतोड उत्तर कामगारांनी आपला विश्वास, सर्वधर्म समभाव असलेली व कामगारांचे खरे नेतृत्व करणारी एकमात्र संघना असलेली "नेशनल रेलव मजदूर युनियनला" उल्लेखनीय विजय मिळवून दिला.
एनएफआयआरशी सलग्न सीआरएमएस ने आपली मान्यता वाचवण्यासाठी सर्वोपोतरी प्रयत्न करून, मान्यता मिळवण्यासाठी सर्व राजकीय संघटना व त्यांना राजकीय समर्थन आणि पाठबळ देऊन उभ्या करण्यात आलेल्या संघटना जसे रेल कामगार संघटना होत्या परंतू कामगारांच्या मनात रुजलेली, १०० वर्षाची परंपरा असलेल्या "नेशनल रेल्वे मजदूर युनियनला ४१.५८%" ने ठासून मान्यता मिळवून देण्यात मोलाच योगदान मध्य रेल्वेच्या कामगारांनी केले आणि विरोधकांना त्यांची जागा दाखून दिली.
नेशनल रेल्वे मजदूर युनियनचे महासचिव कॉ. वेणू पी नायर ह्यांनी निवडणुक प्रक्रियेत उत्साहपूर्ण भाग घेतलेले, आपले बहुमुल्य मत नेशनल रेल्वे मजदूर युनियनला देऊन विश्वास दाखवला त्या सर्व कामगारांचे त्यांनी मनपूर्वक आभार व्यक्त केले. ते म्हणाले कि हि ऐतिहासिक सामुहिक विजय आहे. जो नेशनल रेल्वे मजदूर युनियन तर्फे कामगारांना समर्पित आहे, कामगारांच्या ताकदिची एकतेची आणि प्रगतीची दिशा दर्शवते. प्रत्येक शाखा, मंडळ, मुख्यालय व प्रत्येक सदस्यानी समर्पित होऊन काम केले त्याची हि पोचपावती आहे. हा आनंदाचा सोहळा कामगारांनी व कार्यकर्त्यांनी सायंकाळी ७ वाजता मुंबई CST मध्ये एतिहासिक मिरवणूक व साजरा केला. ह्याच प्रकारे सर्व मंडळात विजयी जुलूस काढण्याचे आदेश मंडळाला/डेपो व कार्यकर्त्यांना देण्यात आले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा