भारतातील बंदर व गोदी कामगारांना १ जानेवारी २०२२ पासून लागू होणारा वेतन करार २७ सप्टेंबर २०२४ रोजी मुंबई येथे संपन्न झाला. कायद्यानुसार झालेल्या वेतन कराराची अद्याप अंमलबजावणी झाली नाही म्हणून, या कराराची अंमलबजावणी करण्यासाठी प्रमुख बंदारांमध्ये १० डिसेंबर २०२४ रोजी दुपारी जेवणाच्या सुट्टीत मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन, मुंबई पोर्ट ट्रस्ट रिटायर्ड एम्प्लॉईज असोसिएशन, मुंबई पोर्ट ट्रस्ट वर्कर्स युनियन, शोअर अँड फ्लोटिला वर्कर्स असोसिएशन, मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानिय लोकाधिकार समिती, मुंबई पोर्ट ट्रस्ट एससी एसटी वेल्फेअर असोसिएशन, यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई बंदरातील सेवेत असलेले कामगार, सेवानिवृत्त कामगार व त्यांच्या कुटुंबियांनी मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. भारतातील बंदर व गोदी कामगारांसाठी २७ सप्टेंबर २०२४ रोजी कायद्यानुसार झालेल्या वेतन कराराची त्वरित अंमलबजावणी न केल्यास १७ डिसेंबर २०२४ नंतर बंदर व गोदी कामगार केव्हाही बेमुदत संपावर जातील,असा स्पष्ट इशारा सर्वच गोदी कामगार नेत्यांनी केंद्र सरकारला दिला. निदर्शनामध्ये सर्वश्री. सुधाकर अपराज, केरसी पारेख, विद्याधर राणे, सी.जे. मेंडोंसा , शीला भगत, मिलिंद घनकुटकर, अंकुश कांबळे, सुधीर मकाकरे, कल्पना देसाई, उदय चौधरी या प्रमुख कामगार नेत्यांनी गोदी कामगारांना मार्गदर्शन केले. सभेचे सूत्रसंचालन मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्पलॉईज युनियनचे सचिव मनीष पाटील यांनी केले तर आभार मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर ज्ञानेश्वर वाडेकर यांनी मानले.
निदर्शनामध्ये मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर श्री. प्रदीप नलावडे, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी सर्वश्री रमेश कुऱ्हाडे, मिर निसार युनूस, आप्पा भोसले , संतोष कदम, व इतर पदाधिकारी, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे पदाधिकारी बबन मेटे,बापू घाडीगावकर , भटकळ व इतर पदाधिकारी. मुंबई पोर्ट ट्रस्ट पेन्शनर्स असोशियशनचे पदाधिकारी, मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानीय लोकाधिकार समितीचे पदाधिकारी, मुंबई पोर्ट ट्रस्ट वर्कर्स युनियनचे पदाधिकारी, फ्लोटीला वर्कर्स असोसिएशनचे पदाधिकारी, व मुंबई पोर्ट ट्रस्ट एससी एसटी वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते व गोदी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपला
मारुती विश्वासराव
प्रसिद्धप्रमुख
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन
addComments
टिप्पणी पोस्ट करा