मुखेड दि.
जगास मार्गदर्शक ठरेल असे संविधान निर्माण करणाऱ्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अमित शहांचे वक्तव्य देशाचे संविधान आणि नागरिकांची अस्मिता यांचा अवमान करणारे असून भाजपाच्या जे पोटात आहे तेच ओठावर आले आहे. सदर वक्तव्याबद्दल अमित शहानी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे अशी मागणी काँग्रेस प्रदेश सचिव डॉ. श्रावण रॅपणवाड यांनी केली आहे.
लोकसभेत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेणे म्हणजे सध्या फॅशन झाले असल्याचे वक्तव्य केले आहे, त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेश सचिव डॉ. श्रावण रॅपनवाड यांनी निषेधात्मक प्रसिद्धी पत्रक काढले आहे. पत्रकात रॅपणवाड यांनी म्हटले आहे की एकीकडे संविधानाचा सन्मान दाखवीत दुसरीकडे संविधानाचे खच्चीकरण करण्याचे काम सातत्याने भाजपा करीत आहे.यापूर्वी जंतरमंतर येथे संविधान जाळल्याच्या घटना, लालकृष्ण अडवाणी यांचे संविधान कालबाह्य झाल्याचे विधान, राम बहादुर रॉय यांचे विधान किंवा कर्नाटकच्या खा.हेगडे याचे संविधान बदलण्याचे विधान आणि भाजपाच्या इतर कृतींचा संदर्भ देत त्यांनी भाजपावर टीका केली आहे.पत्रकात पुढे म्हणाले आहे की डॉ. आंबेडकर हे देशातील प्रत्येक व्यक्तीचे प्रेरणास्थान आहेत. अमित शहांचे विधान भाजपाच्या विकृत विचारसरणीचे द्योतक आहे. त्यांच्या पोटातील द्वेषच ओठांवर आले आहे. छ.शिवाजी महाराज, शाहु महाराज,महात्मा फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महामानवांचा अपमान करणाऱ्या भाजपाची मनुवादी मानसिकता वारंवार उघड झाली आहे, असे काँग्रेसने ठामपणे सांगितले. पत्रकातून काँग्रेसने भाजपाला इशारा दिला की, देशातील संविधान आणि त्यामागील महान व्यक्तिमत्त्वांबद्दल कोणताही अपमान सहन केला जाणार नाही. भारतीय नागरिकांनी छ. शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांना देवतासमान मानले आहे. त्यांचा अपमान करणाऱ्यांना जनतेचा रोष सहन करावा लागेल असा इशाराही काँग्रेस प्रदेश सचिव डॉ. श्रावण रॅपनवाड यांनी प्रसिद्धी पत्रकात शेवटी दिला आहे
addComments
टिप्पणी पोस्ट करा