युवकाचे विनाकारण शोले स्टाईल आंदोलन सहजच वर चढल्याची कबुली दिल्याने नागरिकांनी काढले वेड्यात पोलिसांची मात्र दमछाक


श्रीक्षेत्र माहूर 

शहरातील एक बेरोजगार युवक शोले स्टाईल आंदोलन करून पहावे म्हणून एअरटेलच्या बंद असलेल्या  टावर वर शेवटपर्यंत चढल्याची माहिती मिळाल्याने दबंग पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनी त्याला स्वत वर चढून खाली आणत समजूत काढल्याने  सदरील प्रकार चर्चेचा विषय ठरला होता ही घटना माहूर शहरातील श्री जगदंब हायस्कूलच्या मागे बंद अवस्थेत असलेल्य एअरटेलच्या टावर वर दि 11 रोजी सकाळी 8 वाजता घडल्याने शहरात विविध चर्चांना उधाण आलेले आहे



शहरातील विलास मोतीराम पवार वय 42 वर्ष राहणार गणेश नगर माहूर हा जगदंबा हायस्कूल च्यामागे बंद अवस्थेत असलेल्या एअरटेल कंपनीच्या टावर वर अचानकपणे टॉवरच्या सर्वात वरच्या भागावर चढून गेल्यानंतर नागरिकांचे लक्ष त्याकडे गेल्याने नागरिकांनी माहूर पोलीस ठाण्याचे सपोनी निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांना दूरध्वनीवरून घटनेची कल्पना दिल्याने त्यांनी लगेच सापोनी सुनील गायकवाड पो उप नी पालसिंग ब्राह्मण पोहे का गजानन चौधरी बालाजी राठोड पवन राऊत यांचे सह पोलिसासह टावर गाठून सपोनी शिवप्रकाश मुळे यांनी स्वतःच वर चढून युवकाची समजूत घालत त्यास खाली उतरून पोलीस ठाण्यात आणत विचारपूस केली असता त्याने सहजच वर चाढलों होतो असे सांगितल्याने त्याला समज देऊन सोडून देण्यात आले


युवक टावर वर चढल्याची चर्चा गावभर झाल्याने बघ्यानी टावर जवळ घटना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती काही कारण नसताना टावर वर चढल्याने नागरिकांनी त्यास वेढ्यात काढले तर सपोनी शिवप्रकाश मुळे यांनीजीवाची पर्वा न करता दबंग स्टाईलने टावरवर वरपर्यंत चढून त्याची समजूत काढत खाली सुखरूप आणल्याने  सपोनी शिवप्रकाश मुळे यांचे अभिनंदन होत होते

टिप्पण्या