*रामराव घोनसे यांचे निधन*

देवणी प्रतिनिधी* 

तालुक्यातील तळेगाव (भो) येथील कर्तबगार शेतकरी, जेष्ठ नागरिक रामराव मालबा घोनसे वय ८८ वर्षे. यांचे गुरुवारी दि.२१ रोजी रात्री वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्यावर शुक्रवार दि.२२ रोजी दुपारी २ वाजता तळेगाव (भो) ता. देवणी येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, सुना, नातवंडे असा परिवार असून अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष मालबा घोणसे पाटील यांचे ते वडील होत.

टिप्पण्या