मुखेड(वार्ताहर)दि.... तालुक्यातील हिरानगर तांडा येथील सुपुत्र हवालदार सुधाकर शंकर राठोड हे लेह या ठिकाणी सिंयाचन ग्लेशरमध्ये मायनस -22 डिग्री मध्ये बर्फाळ भागात पोस्टवर आपली ड्युटी बजावत असताना अति थंड व बर्फाच्या रिएक्शन मुळे त्यांना वीरमरण आले. त्यांचा त्यांच्या पार्थिवावर दि.२७ रोज बुधवार सकाळी १० वाजता शासकीय ईतमामात जन्मगाव हिरानगर तांडा (ता. मुखेड) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शहीद सुधाकर राठोड हे २००६ साली भारतीय सैन्य दलात दाखल झाले होते. त्यांची सेवा १९ वर्ष ४ महिने झाली होती. पुढच्याच वर्षी त्यांना स्वयं इच्छुक सेवानिवृत्ती घ्यायची होती. सेवानिवृत्तीच्या काही महिन्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. सुधाकर राठोड हे 127 Lt Ad regt या बटालियनमध्ये आपली ड्युटी बजावत होते. सोमवार दिनांक २५ रोजी पहाटेच्या सुमारास आपली ड्युटी बजावत असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शहीद शंकर राठोड यांचे पार्थिव चंदीगड वरून हैदराबादला विमानाने उद्या मंगळवारी सकाळी येणार आहे. आणि हैदराबाद वरून बाय रोड मुखेड येथे आणण्यात येणार आहे. शहीद सुधाकर राठोड यांचे २००९ साली लग्न झाले होते. त्यांच्या पश्चात आई धोंड्याबाई, पत्नी आशाबाई सुधाकर राठोड, मुलगा ओम(वय ८ वर्ष), मुलगी साक्षी (वय ६ वर्ष) तसेच भाऊ, बहिण असा परिवार आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा