*मराठी रंगभूमीचे अस्तित्व कायम ठेवण्याचे विघ्नहर्ताचे मराठी रंगभूमीदिनी आवाहन* !

 


 मुंबई दि.६: दीडशे वर्षांपेक्षा अधिक काळाची परंपरा असलेली मराठी रंगभूमी अनेक संकटे झेलित उभी आहे.तिचे ऐतिहासिक अस्तित्व कायम ठेवण्यासाठी कलाकार, लेखक आणि तंत्रज्ञ कायम झटत राहातील,असा विश्वास मान्यवरांनी येथे मराठी रंगभूमीदिन सोहळ्यात बोलून दाखवला.

 ‌  राज्य नाट्य स्पर्धेत सलग पाच वेळा प्रथम क्रमांक पटकविणारे आणि सहाव्या अपेक्षीत नामांकणाच्या प्रतिक्षेत असलेल्या श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठानच्या वतीने मंगळवारी माटुंग्याच्या यशवंत चव्हाण नाट्यगृहात मराठी रंगभूमीदिन थाटामाटा संपन्न झाला,त्यावेळी मान्यवर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात मराठी रंगभूमी विषयी आपली अस्मियता व्यक्त केली.

   समारंभाला ज्येष्ठ लेखक आणि समीक्षक दत्ता सावंत,कामगार नाट्यरंगभूमीशी निगडित,ज्येष्ठ कथालेखक काशिनाथ माटल, हौशी रंगभूमीच्या चळवळीत स्वतःला झोकून देऊन कार्यरत असणारे नाटककार रवी वाडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.अध्यक्ष स्थानी श्री.विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता मोरे होते.

     मराठी रंगभूमीदिनाच्या औचित्याने नाट्यचळवीत प्रदीर्घकाळ कार्यरत राहून रंगभूमीची शान वाढविणारे रंगकर्मी बाबा निवतकर, अरविंद रुणकर, संतोष चव्हाण,श्याम जावकर,संतोष सामंत,अशोक प्रधान यांचा शाल,शिफळ आणि मानपत्र देऊन पाहुण्यांच्या हस्ते ऋद्य:सत्कार करण्यात आला.या प्रसंगी संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या एकांकिका लेखन स्पर्धेतील प्रथम विजेते, मुंबईच्या मैदाने बचाव चळवळीचे प्रणेते भास्कर सावंत यांचा मानत्राने सन्मान करण्यात आला.या निमित्ताने घेण्यात आलेल्या काव्यवाचन स्पर्धेतील प्रथम विजेती स्वाती शिवशरण,द्वितीय विजेता सागर सोनावणे,उत्तेजनार्थ मकरंद हळदणकर यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून लेखक कवियत्री विद्या निकम आणि कवी नंदकुमार सावंत यांनी काम पाहिले.

  या प्रसंगी अध्यक्ष दत्ता मोरे म्हणाले, रंगभूमीशी निगडित असलेल्या कला विषयक स्पर्धा घेऊनआम्ही जाणकार कलावंत घडविण्याचे काम करीत आहोत! लेखक दत्ता सावंत मराठी रंगभूमीदिनाची महती विषद करताना म्हणाले, सन १८४३ मध्ये "सीता स्वयंवर"या नाटकाचा  पहिलाच नागरी प्रयोग सांगलीत यशस्वी झाला.तो दिवस थोर निकटकार विष्णूदास भावे यांच्या स्मृतीने‌ साजरा होतो.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल साळवे यांनी केले.प्रास्तविक लेखक महेंद्र कुरघोडे यांनी केले.आभार उपाध्यक्ष राज जैतपाळ यांनी मानले.संस्थेचे विजय सक्रे,अमन दळवी, जयवंत सातोस्कर,आदींचे सहकार्य महत्त्वाचे ठरले.ज्येष्ठ नाट्य,चित्रपट‌ आणि मालिका रंगकर्मी राघव कुमार यांची उपस्थिती विशेष लक्षणीय ठरली.•••••••••

टिप्पण्या