लातूर/प्रतिनिधी: संपूर्ण महाराष्ट्रात शनिवारी विधानसभा निवडणूकीचा निकाल लागणार आहे. या निवडणूक निकालानंतर विनापरवानगी शुभेच्छा बाबतचे जाहिरात, फलक, पोस्टर, झेंडे, भित्तीपत्रके लावू नयेत, असे मा. उच्च न्यायालय खंडपीठ मुबई PIL १५५/२०११ दि. १८/११/२०२४ रोजी सुनावणी घेऊन आदेश दिले आहेत. त्यामुळे या आदेशाचे लातूर शहरात काटेकोरपणे अंमलबजावणी होईल असे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे. लातूर शहरात कोणीही विनापरवानगी बॅनर, पोस्टर, होर्डींग्ज लावल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा लातूर शहर महानगरपालिकेने दिला आहे. या बाबत सर्व क्षेत्रीय अधिका-यांना निर्देश देण्यात आले आहेत. तसेच कुठेही विनापरवानगी बॅनर, पोस्टर लावल्यास तात्काळ कारवाई करण्याची सुचना दिल्या आहेत.
addComments
टिप्पणी पोस्ट करा