सायन्स कॉलेजमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी


 भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती सायन्स कॉलेज नांदेड येथे आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो डॉ एल पी शिंदे यांनी स्थान ग्रहण केले व सर्वप्रथम पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले. कार्यक्रमाच्या संयोजिका प्रो डॉ सौ अरुणा राजेंद्र शुक्ला यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले व सर्वप्रथम प्रास्ताविकात बोलतांना पंडित जवाहरलाल नेहरू यांचे व्यक्तिमत्व व त्यांचे कार्य विशद केले. लाडक्या 'चाचा' नेहरूंना आदरांजली म्हणून त्यांच्या जन्मदिनी अर्थात 14 नोव्हेंबरला भारतात 'बाल दिन' साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन व योग्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळालं तरच ते भविष्यात आदर्श नागरिक होऊ शकतील या विचाराने पंडित नेहरूंनी मुलांसाठी अनेक योजना आखल्या. त्यामुळे 'बाल दिन'च्या निमित्ताने त्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जावं या अनुषंगाने महाविद्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती चे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उप प्राचार्य प्रा ई एम खिल्लारे, गणेश घाटोळे, प्रो डॉ डी आर मुंडे, डॉ यु एस पत्की, सौ अर्चना कुलकर्णी यांची या कार्यक्रमात विशेष उपस्थिती होती. महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित राहून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांची जयंती 

टिप्पण्या