भाजपा महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा राजेश कुतुरकर

 


धर्माबाद : मराठवाड्यातील रजाकरी राजवटीत सर्वाधिक झळा पोहोचलेला जिल्हा म्हणून आपण नांदेड जिल्ह्याकडे पाहतो . रजाकारी राजवटीतून आपण स्वतंत्र झालो. स्वतंत्र भारतात मराठवाडा विलीन झाला. त्यानंतर आपल्या विकासाची गंगा सुसाट वाहिल असे वाटले होते. परंतु दुर्दैवाने मराठवाड्याच्या मानगुटीवर काँग्रेसचे भूत बसले आणि नांदेड सह मराठवाड्याचा विकास खुंटला . नांदेड जिल्ह्याची झालेली वाताहत काँग्रेसमुळे झाली आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणायचे असेल , मोदीजींच्या विकसित भारतात आपल्याला नांदेड जिल्ह्याचा विकास बघायचा असेल तर होऊ घातलेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजपा महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य राजेश कुंटूरकर यांनी केले.

नांदेड लोकसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ. संतुकराव हंबर्डे , नायगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपा चे उमेदवार आ. राजेश पवार यांच्या संयुक्त प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या धर्माबाद तालुक्यातील करखेली येथील बैठकीत ते बोलत होते . 

यावेळी लोकसभेचे उमेदवार डॉ. संतुकराव हंबर्डे,  नायगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार तथा आ. राजेश पवार , एडवोकेट चैतन्य बापू देशमुख , व्यंकटेश जिंदम,  दत्ताहरी चोळंबेकर  , देविदास पाटील , दत्तराम पाटील, सचिन साठे , माणिकराव लोहगावे ,  दीपक पाटील सोळंके , श्रीराम पाटील जगदंबे , मोहित शेठ , देविदास पाटील , दत्ताजी पाटील, गिरी महाराज,  नागनाथ जिंकले , किशन दादा कुदळेकर , विठ्ठल पाटील चोळंबेकर,  विजय पाटील डांगे , कुलकर्णी,  हनुमंत जगदंबे, निवृत्त पोलीस निरीक्षक संभाजी उमरे,  तालुका अध्यक्ष कृष्णा सर्जे , धनंजय सलगरे, विजय पाटील डांगे , सुधाकर पाटील कदम , दत्ता हरी पाटील चिकणेकर , गुलाबराव पाटील मोरे , संतोष पाटील मोरे, चंद्रकांत पाटील पांगरीकर , कुलकर्णी सर ,व्यंकट  येडपलवार ,श्याम जाधव ,मनीष शिंदे, गणेश लोलापूर ,अंकुश नरवाडे , चंद्रकांत कदम, शंकरमामा जाधव , आनंद लोणे , आशुतोष धर्माधिकारी बरबडेकर , राम लुटे , रामकिशन एगलोड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती . करखेली , येताळा आदी ठिकाणी भाजपाच्या प्रचार बैठका पार पडल्या.

या बैठकीत पुढे बोलताना राजेश कुंटूरकर म्हणाले की , राज्यात आणि केंद्रात भाजपा महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे या सरकारमध्ये सहभागी असलेल्या आमदार आणि खासदारांच्या मतदारसंघाचा जो विकास होतो आहे तो विकास मोठ्या प्रमाणात होत आहे . कारण वाडपी आपला असला की आपण कोणत्याही कोणट्यात जेवायला बसलो तरी आपल्याला पोटभर मिळते. या नुसार नायगाव विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आ. राजेश पवार यांनी निधी खेचून आणला त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात विकास कामे होऊ शकली.  परंतु नांदेड लोकसभेचा खासदार आपला नसल्यामुळे जिल्ह्यात विकासाची कामे होऊ शकली नाहीत. त्यामुळे आता विकासाची कामे हवी असतील तर विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीला सर्वाधिक मताधिक्य भाजपला मिळवून देण्याची जबाबदारी आता कार्यकर्त्यांची आहे. नांदेड लोकसभा चा खासदार म्हणून डॉ. संततुकराव हंबर्डे हे कोणत्याही परिस्थितीत निवडून आले पाहिजेत. कारण डॉ.  संतुकराव हंबर्डे हे जर निवडून आले तर आपल्या भागातील प्रत्येक माणूस हा खासदार झाल्यासारखे आपल्याला वाटेल. सर्वसामान्य माणसासोबत राहणारा , सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून गेल्या वीस वर्षापासून संतुकराव हंबर्डे सामाजिक राजकारणात काम करत आहेत. नांदेड लोकसभेवर कमळ फुलल्यानंतर निश्चितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या जिल्ह्याच्या उन्नतीसाठी आणि भरभराटीसाठी भरीव असा निधी देतील. त्यासाठी गरज आहे आपल्या हक्काचा माणूस संसदेत जाऊन तिथून आपल्यासाठी निधी खेचून आणणारा. त्यामुळे येत्या २० तारखेला मनात कोणतेही किंतु परंतु न ठेवता मराठवाडा मुक्ती संग्रामाप्रमाणे आता मराठवाड्यातून काँग्रेसलाही मुक्ती देऊन टाका . तरच आपल्या विकासाचा मार्ग महायुतीचे सरकार अत्यंत दणकटपणे आणि प्रभावीपणे राबवू शकेल असेही ते म्हणाले.

चौकट 

भारतीय जनता पार्टीत गेल्या अनेक वर्षापासून मी काम करत आहे  मी शेतकऱ्याचा मुलगा आहे .सर्वसामान्य कुटुंबातील आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या , शेतमजुरांच्या ,भाजीपाला उत्पादकाच्या समस्या मला माहित आहेत. आपल्या भागाच्या विकासासाठी भाजपाचा आमदार काम करतो आहे . त्यात भर पडावी आणि खासदाराचा निधी या भागाला मिळावा यासाठी आता होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत कमळ या निशाणी समोरिल बटन दाबून भाजपाला प्रचंड मतांनी विजयी करा. तुमचे  भाजपाला मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत होय. आता मताची विभागणी आणि विभाजन होऊ देऊ नका असे आवाहन ही लोकसभेचे उमेदवार डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी केले

टिप्पण्या