नांदेड (प्रतिनिधी)- उत्तम नियोजन, प्रभावी यंत्रणा आणि महायुतीचे शिस्तबद्ध संघटन या त्रिसुत्रीच्या बळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कौठा येथील मैदानावर झालेली ‘अभूतपूर्व’ जाहीरसभा नांदेड जिल्ह्यात महायुतीच्या विजयाची नांदी ठरणार आहे. विशाल जनसमुदाय, कार्यकर्त्यांचे कठोर परिश्रम आणि महायुतीच्या एकजुटीचे प्रभावशाली दर्शन घडवून ही जाहीरसभा यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज खा. डॉ. अजित गोपछडे यांचे व सर्व कार्यकर्त्यांचे फोन करुन कौतुक केले.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचे महायुतीचे उमेदवार डॉ.संतुकराव हंबर्डे व जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवार दि. 9 नोव्हेंबर रोजी कौठा येथील मैदानावर प्रचंड जाहीरसभा झाली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती लाभली. या सभेला अक्षरशः प्रचंड जनसागर उसळला होत. अभूतपूर्व प्रतिसादामुळे ही सभा महायुतीच्या विजयासाठी निर्णायक ठरणार हे आता स्पष्ट दिसून येत आहे. संयोजकांचे शिस्तबद्ध नियोजन हे या जाहीरसभेचे वैशिष्ट्य ठरले.भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाइं मित्रपक्षांसह महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेला नांदेड जिल्ह्यातील सर्व श्रेणीतील नागरिक उपस्थित राहण्यासाठी उत्तम नियोजन केले. भाजपा नेते खा. अशोकराव चव्हाण, मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, शिवसेना उपनेते आ. हेमंत पाटील महायुतीचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी नांदेड लोकसभेचे उमेदवार सर्वश्री डॉ.संतुकराव हंबर्डे, विधान सभेचे उमेदवार मा.खा. प्रताप पाटील चिखलीकर, आ. राजेश पवार, आ. तुषार राठोड, आ. भिभराव केराम, आ. बालाजी कल्याणकर, मा. आ. जितेश अंतापुरकर , बाबुराव कदम, आनंद पा. बोंढारकर, कु.श्रीजया चव्हाण आदींनीही ही जाहीरसभा यशस्वी करण्यासाठी महत्वपूर्ण प्रयत्न केले.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनेचे लाभार्थी, शेतकरी सर्व श्रेणीतील व्यवसायिक, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, वकील, सीए, प्राध्यापक, शिक्षक, उद्योजक, व्यापारी, महिला, युवक, विद्यार्थी आदी श्रेणीतील नागरिक प्रचंड संख्येने आपले लाडके पंतप्रधान मोदीजींचे भाषण ऐकण्यासाठी वेळेपूर्वी उपस्थित झाले होते.केंद्र आणि राज्यात एकाच विचारांचे डबल इंजिन सरकार विकासाला गती देण्यासाठी सक्षम असते याची प्रचिती आल्यामुळे नांदेड लोकसभा आणि जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व 9 जागा महायुती जिंकणार असा विश्वास यासभेत उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला.
addComments
टिप्पणी पोस्ट करा