संविधान गौरव दिनी दिग्दर्शक राम परसैय्या यांच्या हस्ते विष्णुपूरीकर यांचा सत्कार


नांदेड- संविधान गौरव दिनानिमित्त कै. लक्ष्मीबाई विठ्ठल शिखरे सामाजिक संस्था हडपसर पुणे मगरआळी च्यावतीने संविधान गौरव दिनाचे आयोजन दि. 26 नोव्हेंबर 2024 रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीबाई शिखरे ह्या होत्या. सदरील कार्यक्रमास हेमंतकुमार बळीराम ढवळे यांनी त्यांच्या आईवडीलांच्या स्मरणार्थ कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांना भारतीय संविधानाची प्रत भेट, शाल, श्रीफळ देऊन सन्मानीत केले. यावेळी नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते वामनराव मे विष्णुपूरीकर यांच्या सामाजिक व धार्मिक कार्याची दखल घेऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानव चित्रपटाचे दिग्दर्शक तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री राम परसैय्या यांनी विष्णुपूरीकर यांचा संविधानाची प्रत व शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.

यावेळी उपस्थित मान्यवरांकडून संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुरेश भोसले यांनी केले. प्रा. विद्या संतोष होडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भागुजी शिखरे, दिनकरराव (तात्या) सोनवणे, प्रा. सुरेश भोसले, भारतीबाई शिखरे यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचलन दिनकर (तात्या) सोनवणे यांनी केले. कार्यक्रमास ज्ञानोबा कांबळे, डॉ. सुरेश शिखरे, श्रीहरी गायकवाड, संगीता भोसले, जयश्री शिखरे, राजेश सोनवणे, सिद्धार्थ गर्दे, विजया आबनावे, स्मिता आबनावे, लता ढवळे, विकास शेलार, लक्ष्मण लोखंडे, गवळी, हरिभाऊ साळुंके, आरती सोनवणे, सुनिता कांबळे आदी उपस्थित 

टिप्पण्या