*राज्य वुशू क्रीडा स्पर्धा शानदार उद्घाटन* *खेळातून विद्यार्थ्यांनी करिअर घडवावे -डॉ. संजय रोडगे*



सेलू.  (.         )ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशन व एल. के. आर. आर. प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 21वी जुनिअर व 22 वी जुनियर युथ मुले/ मुले राज्यस्तरीय वूशू अजिंक्यपद स्पर्धेचा शानदार उद्घाटन सोहळा दि. १५ नोव्हेंबर रोजी संपन्न झाला.

            यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा परभणी जिल्हा वूशु असोसिएशनचे अध्यक्ष. डॉ. संजय रोडगे, संस्थेच्या सचिव डॉ. सविता रोडगे, एस.एस. कटके महासचिव महाराष्ट्र राज्य वूशु असोसिएशन, जिल्हा सचिव गणेश कुटे, शैलेश तोष्णीवाल,  रवि डासाळकर, विशाल काला, प्रवीण काला, डॉ. अरविंद बोराडे, माणिकराव डख,आनंद मालानी, नाना पौळ, ॲड. दत्तराव कदम,  प्रफुल्ल कुमार विनायके, डॉ. कुंदन राऊत,  संजय परतानी,  अशोक पटवारी, गणेश माळवे, नागेश कान्हेकर, प्राचार्य कार्तिकी श्रीपाद रोडगे, आदी मान्यवर उपस्थित होते.


याप्रसंगी बोलताना डॉ. संजय रोडगे म्हणाले की, आपल्या देशामध्ये सरासरी काही मोजकेच खेळ सर्व विद्यार्थी खेळतात जसे की क्रिकेट हॉलीबॉल इत्यादी परंतु वूशू सारखे काही खेळ आहेत की ज्या खेळामध्ये  विद्यार्थी भाग घेऊन आपले करिअर घडूवू शकतात. राज्यस्तरीय विजेत्या खेळाडूंना अशा स्पर्धेचा फायदा विविध राज्यस्तरीय स्पर्धापरीक्षेमध्ये देखील होतो. भारत हा लोकसंख्येच्या बाबतीत जरी मोठा देश असला तरी ऑलम्पिक स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी आपण अद्याप करू शकलो नाहीत. तरी उपस्थित सर्व खेळाडूंनी देश पातळीवर तसेच ऑलिंपिक स्पर्धेत देखील उत्तम कामगिरी करून देशासाठी सुवर्णपदक जिंकून द्याव्यात असे यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.


याप्रसंगी बोलताना वूशू असोसिएशनचे महासचिव एस.एस कटके म्हणाले की, आज रोजी पर्यंत महाराष्ट्रामध्ये आम्ही विविध स्पर्धेचे आयोजन केले आहे. परंतु या ठिकाणचे नियोजन बघता, असे सुंदर नियोजन इतर कुठल्याही ठिकाणी झाले नाही त्याबद्दल त्यांनी प्रथमतः डॉ. संजय रोडगे यांचे आभार मानले. विविध ठिकाणी स्पर्धा आयोजित केल्यानंतर असे लक्षात येते की प्रत्यक्ष संस्थाचालकांची खेळाविषयी तळमळ पाहिजे तशी दिसून येत नाही, परंतु डॉ. संजय रोडगे यांचे नियोजन व त्यांचा प्रत्यक्ष सहभाग खूप सारी ऊर्जा देऊन जातो. डॉ. संजय रोडगे यांनी तालुकास्तरावरती अशा पद्धतीचे काम तर करतच राहावे परंतु राज्य पातळीवर देखील अशा व्यक्तींनी विशेष लक्ष द्यावे अशी विनंती केली.याप्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू श्री. संदीप शिलार, प्रतीक्षा शिंदे, श्रावणी कटके, सुरत सोनकांबळे यांचाही गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डिगांबर टाके, यांनी केले तर आभार प्रदर्शन अशोक बोडके यांनी मांनले.स्पर्धा यशस्वीतेसाठी महादेव सांबळे, क्रीडा शिक्षक कपिल ठाकुर, गायकवाड,

टिप्पण्या